24 October 2020

News Flash

‘अमित शाह म्हणाले, भारत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार’

विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना १४ जुलै रोजी होणार आहे.

भारत अंतिम सामना खेळणार?

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कर्नाटकमधील राजकीय नाट्य आणि सध्या देशभरात असलेल्या क्रिकेट फिव्हरवरुन भाजपाला टोला लागावला आहे. भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारत विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात खेळण्यासंदर्भातली तडजोड केल्याचे अब्दुल्ला यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

भारत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाल्यापासून अनेक विनोद व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल होताना दिसत आहेत. एकीकडे इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या मैदानावर विश्वचषकासाठी स्पर्धा सुरु असतानाच इकडे देशात कर्नाटकमध्ये सत्ता टिकवण्यासाठी राजकीय स्पर्धा सुरु आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडून अनेक मेजदार विनोद व्हायरल झाले आहेत. असाच एक विनोद ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करताना ‘व्हॉट्सअपवर आलेला हा विनोद मला खूपच आवडला’ असं म्हणत अमित शाह यांना टोमणा मारला आहे. आपल्या ट्विटमध्ये अब्दुल्ला म्हणतात, ‘न्यूझीलंडच्या नऊ खेळाडूंनी राजीनामा देऊन भारतीय संघात प्रवेश केला आहे. अमित शाह यांनी भारत अंतीम सामना खेळणार असल्याची घोषणा केली आहे.’

या ट्विटरवरुन काहींनी अब्दुल्ला यांच्यावर टिका केली आहे. तर काहींनी अशाच प्रकारचे व्हॉट्सअप विनोद शेअर केले आहेत. कर्नाटकमधील सरकार टिकवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु असून दोन्ही बाजूने एकमेकांवर घोडेबाजार होत असल्याचा आरोप केला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणारी ही राजकीय चढाओढ अनेक नाट्यमय वळणांनंतरही सुरु असून अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान ज्या दिवशी भारत आणि न्यूझीलंड सामना सुरु होता त्याच संध्याकाळी गोव्यातील विरोधी पक्षनेत्यांसहीत दहा आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भारताचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार सकाळपासून राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील या दोन घटनांचा मेळ घालत अनेक विनोद समाज माध्यमांवर व्हायरल झालेले दिसत आहेत. दरम्यान विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये १४ जुलै रोजी रंगणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 3:38 pm

Web Title: amit shah says india will play final tweets omar abdullah scsg 91
Next Stories
1 WC 2019 : भारताच्या पराभवावर शोएब अख्तर म्हणतो…
2 World Cup 2019 : विराटने शास्त्रींचं ऐकलं नाही आणि सामना गमावला
3 WC 2019 : ‘आम्ही अपयशी ठरलो’; हिटमॅनची प्रामाणिक कबुली
Just Now!
X