सोशल मीडियावर गेल्या वर्षी दिल्लीच्या मालवीय नगरमधील ‘बाबा का ढाबा’ चांगलाच चर्चेत आला होता. लॉकडाउनमुळे आर्थिक कंबरडं मोडलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांना मदत करण्यासाठी लोकांनी त्याच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. युट्यूबवर गौरव वासन याने हा व्हिडीओ शूट केला होता, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले होते. त्यानंतर देखीव अनेकांना त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्यानंतर त्यांनी एक रेस्टॉरंटदेखील सुरु केलं होतं. मात्र आता पुन्हा त्यांच्या नशिबी जुने दिवस आले आहेत.

बाबा का ढाबा प्रकरण : मालकाच्या खात्यावर जमा झाले ४२ लाख; दिल्ली पोलिसांचा अहवाल

कांता प्रसाद यांचे हे रेस्टॉरंट आता लॉकडाऊनमध्ये बंद झाले आहे. कांता प्रसाद आपल्या जुन्या जागी बाबा का ढाबा येथे पूर्वीप्रमाणेच ग्राहकांच्या येण्याची वाट पाहत आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार बाबाका ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचे रेस्टॉरंट फेब्रुवारीमध्ये बंद झाले. त्यामुळे ते आता ढाब्यावर परतले आहेत. पण पूर्वीसारखी कमाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची कमाई १० पटीने वाढली होती. बाबा का ढाबा सोशल मीडियावर तुफान प्रसिद्ध झाला होता.

“दिल्लीतील कोरोनामुळे त्यांचा जुना ढाबा १७ दिवस बंद ठेवावा लागला, त्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती आली आहे” असे कांता प्रसाद यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे ढाब्यावर होत असलेल्या गर्दी कमी झाली आहे. लॉकडाउनपूर्वी आमची रोजची ३५०० रुपयांचा व्यवसाय होत होता आता तो १००० रुपयांवर आला आहे. माझ्या कुटुंबाच्या जगण्यासाठी हे पुरेसे नाही असे कांता प्रसाद म्हणाले.

बिग बींनी ‘बाबा का ढाबा’ला केली लाखोंची मदत; केबीसीतील चर्चेनंतर झाला खुलासा

गेल्यावर्षी मिळाली होती मोठी मदत

गेल्या वर्षी बाबा का ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांता प्रसाद यांना अनेक लाखांची आर्थिक मदत मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एक नवीन रेस्टॉरंट उघडले. घराची दुरुस्ती केली, जुने कर्जाची परतफेड केली. स्वत: साठी आणि आपल्या मुलांसाठी स्मार्टफोन खरेदी केली होती.  आता मात्र त्यांचे हे चांगले दिवस गेले आहेत.

लाईट्स, CCTV कॅमेरा अन् गल्ला… ‘बाबा का ढाबा’ फेम कांता प्रसाद यांच्या नव्या रेस्तराँची झलक

डिसेंबरमध्ये सुरु केले होते नविन रेस्टॉरंट

कांता प्रसाद यांनी डिसेंबरमध्ये मोठ्या उत्साहात आपले नवीन रेस्टॉरंट उघडले होते. रेस्टॉरंटमध्ये ते सर्व कामावर लक्ष ठेवत असत. त्यांची पत्नी आणि दोन मुले पैशांच्या काऊंटरवर बसत. दोन स्वयंपाकी आणि एक वेटर त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये होते. सुरुवातीच्या उत्साहानंतर ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली आणि रेस्टॉरंटवरील खर्चाचा भार वाढू लागला. नुकसान होऊ लागल्याने कांता प्रसाद यांच्यावर आता पुन्हा त्याच ढाब्यावर जाण्याची वेळ आली आहे.