News Flash

आजींचं भन्नाट डोकं! ‘गुडलक’साठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये टाकली नाणी

आजींमुळे प्रवाशांच्या जीवावर बेतलं असतं

पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही नाणी बाहेर काढण्यात आली

आजही आपल्या खेड्या पाड्यात प्रवासाला निघताना नारळ फोडण्याची किंवा हार फुलं रस्त्याला वाहण्याची प्रथा आहे. समुद्र किंवा नदी मार्गाने प्रवास करताना श्रद्धा म्हणून अनेक जण नाणी देखील नदीच्या पात्रात टाकायचे. ही पद्धत आजही अनेक गावात असेल. पण या गोष्टी कधी आणि कुठे करायला या प्रत्येकाला ठावूक असलं पाहिजे नाहीतर चीनमधल्या आजींसारखी गत व्हायची. या आजींनी सुदैवासाठी म्हणजे गुड लकसाठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये नाणी फेकली. ८० वर्षांच्या या आजी आपल्या सूनेसोबत चायना साऊदर्न एअरलाईन्सने प्रवास करत होत्या. विमानात चढताना कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे दहा एक  नाणी त्यांनी इंजिनमध्ये फेकली.

वाचा : ब्रेसलेटची किंमत ऐकून महिला दुकानातच बेशुद्ध पडली

जेव्हा विमान टेक ऑफ करण्याच्या आधी सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांना इंजिनमध्ये नाणी सापडली. कर्मचाऱ्यांनी ही नाणी बाहेर काढली. आजींच्या या प्रतापामुळे विमानाला इच्छित स्थळी पोहोचायला पाच तास उशीर झाला. जर हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती. विमानातल्या प्रवाशांच्या जिवावरही बेतलं असतं तेव्हा समस्त प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासाठी या आजींना विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी अटक केलीय.

Viral Video : शाळेत मोबाईल आणणाऱ्या मुलांना अशी घडवली जाते अद्दल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 9:58 am

Web Title: granny throws coins into engine for good luck
Next Stories
1 केंद्रीय मंत्र्यांची सार्वजनिक ठिकाणी लघुशंका; स्वच्छता अभियानावरच पाणी फेरले!
2 Viral Video : जेव्हा ट्रम्प महिला पत्रकाराच्या हास्यावर भाळतात
3 विमानात जन्मलेल्या ‘त्या’ बाळाला मोफत विमानप्रवासाची संधी
Just Now!
X