अतिशय कमी शब्दात आपले मत व्यक्त करण्यासाठी ‘मायक्रो-ब्लॉगींग’ साईट ‘ट्विटर’चा वापर केला जातो. आजकाल अनेक सेलिब्रीटी, राजकीयनेते, सर्वसामान्य माणसे त्यांची मते मांडून अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्विटरचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी याच ट्विटरने पाच नवीन डिझायन लाँच केले होते. ट्विटरचा हा नवा लूक पहिल्यापेक्षा दर्जेदार असल्याचे कंपनीने म्हटले होते. परंतु अनेकांसाठी ही डोकीदुखी झाली आहे. ट्विटरचा हा नवा लूक तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हीदेखीवल जुना लूक पुन्हा मिळवू शकता.

ट्विटरला जलद, दर्जेदार आणि सोपे करण्यासाठी कंपनीकडून अनेक बदल केले होते. नव्या डिझायनमध्ये यूझर्सला त्यांच्या आवडीनुसार थीमचा रंग निवडता येत आहे. नव्या अपडेटने ट्विटरचा लूक पूर्णपणे बदलला आहे. ट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्येही बदल केले होते. काही यूजर्सला ट्विटरचा हा नवा लूक डोकेदूखी आणि त्रासदायक झाला आहे. ट्विटरचा पुन्हा जुना लूक मिळवण्याचे पुढील पर्याय आहे-

-ट्विटर अकाऊंट लॉगइन करा

-डाव्या बाजूला असलेल्या More या पर्यायावर क्लिक करा

-त्यानंतर About Twitter हा पर्याय निवडा

-या पर्यायामधील Directory पर्याय निवडा

-त्यानंतर Home पर्यायावर क्लिक करा

वरील दिलेल्या पद्धतीने तुम्हाला ट्विटरचे जुने लूक तुम्हाला परत मिळवता येणार आहे