महिद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. त्यांची ट्वीट्स अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत असतात. तसंच त्यांची ट्वीट्स अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत असतात. नुकताच आनंद महिंद्रांनी चेननं झाडाला बांधलेल्या एका स्कॉर्पिओ कारचा फोटो शेअर केला आहे. तो फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“हे कोणत्याही प्रकारचा हायटेक उपाय नाही. या गाडीबाबत मालक किती पझेसिव्ह आहे हे यातून दिसून येत आहे. मला लॉकडाउनमध्ये कसं वाटलं हे हा फोटो उत्तमरित्या दाखवत आहे. मी आता ती ती चेन तोडण्याचा प्रयत्न करतोय (मास्क परिधान करून),” असं कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी या फोटोला दिलं आहे.

यापूर्वीही त्यांनी महिंद्रा स्कॉर्पिओचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात मालकानं बहुमजली घराच्या छतावर स्कॉर्पिओ गाडी ठेवली होती. मालकानं पाण्याच्या टाकीच्या स्वरूपात ती गाडी छतावर ठेवली होती. दरम्यान, गुरूवारी महिंद्रा यांनी ट्वीट करत थार या कारचं उत्पादन वाढवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं होतं. लाँचनंतर थार या गाडीचं एका महिन्यात २० हजारांपेक्षा अधिक जणांनी बुकींग केलं होतं. एवढंच नाही तर या गाडीसाठी ग्राहकांना सात महिने थांबावं लागत आहे.