News Flash

लवकरच पुण्याच्या रेस्टॉरंट्समध्ये पदार्थांचे 3D मॉडेल्स दाखविणारे अ‍ॅप वापरले जाणार.. जाणून घ्या या अ‍ॅपबद्दल!

रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपण ऑर्डर करत असलेले पदार्थ कसे असतील याचा अंदाज कागदी मेन्यू कार्डवरील नाव येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी स्टार्टअपची सुरुवात केली आहे.

peAR Technologies
peAR टेक्नोलॉजीज टीम (फोटो क्रेडीट: Indian Express & Pexeles )

मेच्या अखेरीस peAR टेक्नोलॉजीज रेस्टॉरंट मेनूमध्ये डीपटेक कॉम्प्यूटर व्हिजन आणि augmented reality (AR) टेक्नोलॉजीज आणणार आहेत. यासाठी त्यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी त्यांनी जमा केला. २०१९ मध्ये सुरू झालेल्या मुंबई-आधारित स्टार्टअपने सिद्ध केले की त्याची संकल्पना व्यवस्थित काम करते. ३ तरुणांनी मिळून ह्या संकल्पनेची सुरुवात केली आहे. त्यांच्या सोबत घडलेल्या छोट्याशा प्रसंगामुळे हि कल्पना त्यांना सुचली आहे. ध्रुवेश मेहता, पार्थ वोरा आणि धर्मीन वोरा या तरुणांनी peAR टेक्नोलॉजीज या स्टार्टअपची सुरुवात केली. जानेवारी २०२० ला या अॅपचे लाँच झाले. लाँच केल्यापासून लॉकडाउमुळे रेस्टॉरंट्स बंद होईपर्यन्त  स्टार्टअपला प्रत्येक महिन्यात १००% ग्रोथ दिसून आली.

peAR टेक्नोलॉजीज काय सर्विसेस देतात?

peAR टेक्नोलॉजीजची स्थापना करणारे ध्रुवेश मेहता आणि पार्थ वोरा यांच्यासमवेत धर्मीन वोरा म्हणतात, “जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाची ऑर्डर देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही कागदी मेन्यू कार्ड बघता. ते कार्ड बघितल्यावर तुम्ही लिहलेल्या नावावरूनच नक्की कशाप्रकारची डिश असेल याचा विचार करता. लिहलेल्या नावाच्या १०० डिश असू शकतात. खरतर रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेल्यावर आपण अनेकदा अंधारात बाण सोडण्यासारखेच ऑर्डर करतो. कारण आपण ज्या डिशची ऑर्डर दिली आहे ती येईपर्यन्त ती कशी असेल याचा अंदाजही बांधता येत नाही. आम्ही मात्र तुम्हाला जे पदार्थ खायचे आहेत ते तुमच्या टेबलवरती तुम्ही विकत घेण्याच्या आधी कसे दिसतील हे सादर करतो. यासाठी आम्ही आम्ही एआर आणि इतर तंत्रज्ञान वापरतो” सध्या स्टार्टअपमध्ये एक टीम आहे जी रेस्टॉरंट्समधील प्रत्येक वस्तूच्या जवळजवळ ३०० इमेजेस कॅप्चर करते आणि त्यांना प्रोप्रायटरी संगणक प्रणालीमध्ये फीड करते जे चित्रांना ३ डी मॉडेलमध्ये रूपांतरित करते.

peAR टेक्नोलॉजीज कल्पना कशी सुचली?

मुंबईच्या डीजे संघवी महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या पार्थ आणि ध्रुवेशला फूड ब्लॉगर धर्तीनला रेस्टॉरंटमध्ये पॅनकेक ऑर्डर दिल्यानंतर peAR टेक्नोलॉजीज कल्पना सुचली. त्यांनी जेव्हा ऑर्डर दिली तेव्हा त्यांना प्लेटमध्ये ३ पॅनकेकची अपेक्षा होती पण त्या ऐवजी फक्त एकच पॅनकेक आला. ही समस्या कोणाला येऊ नये यावर काही तरी तोडगा काढायला हवा यातूनच peAR टेक्नोलॉजीजची सुरुवात झाली.

पुण्याच्या रेस्टॉरंटमध्ये कधी सुरु होणार ही टेक्नॉलॉजी ?

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात ह्या टेक्नॉलॉजीच लाँच होणार आहे. कंपनी आधीच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आसपास असलेल्या १०० हून अधिक रेस्टॉरंट्समध्ये काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2021 7:01 pm

Web Title: soon pune restaurants will have app that will show diners 3d models of food items ttg 97
Next Stories
1 आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सुरु करणार स्वत:चा आयटी सेल
2 Flashback: स्त्री-पुरुष समानता अन् कॉमन टॉयलेटमधील कमोड…; जेव्हा हेमांगी कवीने पुरुषांना सुनावलं होतं
3 OnThisDay in 2002: साहेबाला नमवत सौरव गांगुलीनं लॉर्ड्सवर काढला होता टी शर्ट
Just Now!
X