News Flash

इराण,अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांना घ्यायचंय ‘या’ संस्कृत विद्यापीठात शिक्षण; नरेंद्र मोदींनी केलं होतं उद्घाटन

बांग्लादेश, इराण आणि अफगाणिस्तान येथील विद्यार्थ्यांनी या विद्यापिठात प्रवेशासाठी अर्ज केला आहे

श्री सोमनाथ संस्कृत विद्यापिठ (फोटो फेसबुक)

भारतीय संस्कती आणि भाषेचे जगभरातील लोकांना मोठ्या प्रमाणात आकर्षण असल्याचे पाहायला मिळते. वसुधैव कुटुम्बकम् संदेशामुळे भारतीय संस्कृती ही कुटुंबवत्सल संस्कृती आहे. त्यामुळेच जगभरातील लोकांना भारताचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. यामुळेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशातील लोक या संस्कतीचा अनुभव घेण्यासाठी किंवा अभ्यासासाठी भारतात येत असतात. मुस्लीम देशांमधील विद्यार्थ्यांमध्येही भारतीय संस्कृतीबद्दल आकर्षण वाढत आहे. अशातच पहिल्यांदाच बांग्लादेश, इराण आणि अफगाणिस्तान येथील तीन विद्यार्थ्यांनी गुजरातच्या संस्कृत विद्यापिठात प्रवेश घेतला आहे.

गुजरातच्या वेरावल येथे असणाऱ्या श्री सोमनाथ संस्कृत विद्यापिठात परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रमुख ललित पटेल यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पहिल्यांदाच परदेशी विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासक्रमासाठी एकून ९ परदेशी विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. मात्र त्यांना हवे असलेला अभ्यासक्रम या विद्यापिठात नसल्याने त्यांचा प्रवेश झाला नाही.

कोणत्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

इरानच्या फरशाद सालेहजही याने संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी कला शाखेत प्रवेश घेतला आहे. बांग्लादेशच्या राथिंद्रो सरकारने संस्कृत भाषेत डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेतला आहे. अफगाणिस्तानच्या एका विद्यार्थ्यालाही या विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. हे विद्यापीठ इंडियन काउसिंल फॉर कल्चरल रिलेशन (ICCR) अंतर्गत काम करत आहे.

नरेंद्र मोदींनी केलं होतं उद्घाटन

श्री सोमनाथ संस्कृत विद्यापिठाची स्थापना २००५ मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. पंतप्रधान देखील अनेक वेळा परदेशांमध्ये संस्कृत भाषेचा प्रसार करण्यासाठी काम करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. केंद्रातील भाजपा सरकार देखील संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी खूप वेळापासून प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यासाठीच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ असणाऱ्या बागेतील सर्व झाडांची नावे आणि सूचना फलक हे संस्कृत भाषेतील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 9:25 am

Web Title: students from bangladesh iran afghanistan sends application learn from sanskrit university in gujarat abn 97
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 रुग्णवाहिका चालकांनी रात्रीच्या शिफ्टमध्ये ब्रेक घेऊन गायले गाणे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!
2 गजा गेला… ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स’ने नोंद घेतलेल्या सांगलीमधील बैलाचं निधन
3 मुलगी रेवतीच्या ‘खास गिफ्ट’ने सुप्रिया सुळे भारावल्या; फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
Just Now!
X