News Flash

मोबाईल दरवाढीचं नो टेंशन, ‘या’ युजर्सना नाही मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केली असली तरी...

दूरसंचार कंपन्यांनी आपले टॅरिफ प्लॅनचे महाग केलेत. Airtel आणि Vodafone-Idea ची दरवाढ कालपासून (3 डिसेंबर) लागू झालीये. तर , Reliance Jio ची दरवाढ 6 डिसेंबर लागू होणार आहे. या दरवाढीचा थेट परिणाम सर्व प्रीपेड ग्राहकांवर पडणार आहे. यामध्ये सर्वप्रथम व्होडाफोन-आयडियाने टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, एअरटेलनेही आपले टॅरिफ प्लॅन वाढवण्याचं जाहीर केलं. तर, जिओने अद्याप नव्या प्लॅन्सबाबत माहिती दिलेली नाहीये.

या ग्राहकांना नाही द्यावे लागणार अतिरिक्त पैसे –
टेलिकॉम कंपन्यांनी केवळ प्रीपेड प्लॅन्समध्येच दरवाढ केली आहे. त्यामुळे पोस्टपेड ग्राहकांना दिलासा मिळालाय. सध्यातरी पोस्टपेड ग्राहकांच्या टॅरिफ दरावर कोणताही परिणाम होणार नाहीये. पोस्टपेड ग्राहकांना आधीइतक्याच बिलाचा भरणा करावा लागेल. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण, लवकरच पोस्टपेड सेवांचे दर देखील वाढवण्याचा टेलिकॉम कंपन्यांचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सध्यातरी पोस्टपेड ग्राहकांच्या टॅरिफ दरावर कोणताही परिणाम होणार नाहीये.

आणखी वाचा- Airtel आणि Vodafone ग्राहकांना झटका, दोन लोकप्रिय प्लॅन बंद; नवा पर्याय कोणता ?

एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडियाने किती दरवाढ केली –
एअरटेल :
* प्रतिदिन ५० पैसे ते २.८५ रुपये दरवाढ
* डेटा आणि कॉलिंगचे भरघोस फायदे देण्याचा दावा
* निश्चित कॉलमर्यादा ओलांडल्यास प्रतिमिनीट ६ पैसे

जिओ :
* ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्क्य़ांपर्यंत दरवाढ
* नव्या प्लॅन्समधून ग्राहकांना ३०० टक्के अधिक लाभ देण्याचा दावा
’‘ऑल इन वन प्लॅन्स’ मध्ये अमर्याद संभाषण आणि इंटरनेट वापराचा दावा

व्होडाफोन-आयडिया :
* अन्य कंपन्यांच्या मोबाइलवर केलेल्या कॉलसाठी प्रतिमिनीट ६ पैसे
* दरवाढीमुळे १,६९९ रुपयांचा अमर्याद वार्षिक प्लॅन २,३९९ रुपयांवर
* प्रतिदिन १.५ जीबी डेटा वापराचा अमर्याद प्लॅन १९९ वरून २४९ रुपयांवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 3:58 pm

Web Title: these mobile users wont be affected by tariff price hike sas 89
Next Stories
1 मांजर मेली, ‘नासा’ने वाहिली श्रद्धांजली; इंटरनेटवर अश्रूंचा पूर
2 सुंदर पिचाईंचं प्रमोशन, एकाचवेळी दोन कंपन्यांचे CEO बनण्याची साधली किमया
3 ‘या’ कारणामुळे फ्लशला असतात दोन बटणं!
Just Now!
X