News Flash

UPSC IAS interview question: उमेदवाराला विचारलं तुम्ही इतके बारीक का?

आयएएस अधिकारी बनण्यासाठी उमेदवार खरंच पात्र आहे की नाही, हे पडताळण्यासाठी...

(सांकेतिक छायाचित्र)

UPSC IAS interview question: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देशातील सर्वाधिक कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेचा इंटरव्ह्यू साधारण २० ते २५ मिनिटांचा असतो. आयएएस अधिकारी बनण्यासाठी उमेदवार खरंच पात्र आहे की नाही, हे पडताळण्यासाठी असे काही प्रश्न विचारले जातात की उमेदवारांचा चांगलाच गोंधळ उडतो, ते संभ्रमावस्थेत जातात. काय उत्तर द्यावं हेच त्यांना समजत नाही. आपलं पुस्तक ‘द स्टील फ्रेम: अ हिस्ट्री ऑफ आयएएस’ बाबत दिलेल्या एका मुलाखतीत यूपीएससीच्या कठीण प्रश्नांचं उदाहरण देताना यूपीएससीचे माजी चेअरमन दीपक गुप्ता यांनी अशाच एका इंटरव्ह्यूची आठवण सांगितली.

चेअरमन दीपक गुप्‍ता यांनी एक जुनी आठवण सांगताना, एकदा इंटरव्ह्यू बोर्डाच्या सदस्याने उमेदवाराला तुम्ही इतके बारीक किंवा लुकडे का आहात असा प्रश्न विचारल्याचं सांगितलं. “त्या उमेदवाराला Why are you so Lean and Thin? ( तुम्ही इतके लुकडे का आहात? ) असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उमेदवाराने – Sir, IAS is not joke and Allahabad University is not sanatorium ( सर, आयएएस म्हणजे काही विनोद नाहीये आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटी म्हणजे काही रुग्णांना ठणठणीत होईपर्यंत ठेवण्याची जागा नाही) असं उत्तर दिलं”. उमेदवाराच्या उत्तराने बोर्डाचे सदस्य चांगलेच प्रभावित झाले असंही गुप्ता यांनी सांगितलं.

गुप्ता पुढे म्हणाले की, “अशाप्रकारे तुमच्या व्यक्तीमत्त्वातील प्रामाणिकपणाची झलक दिसायला हवी. तुम्हाला तुमचं म्हणणं किंवा भूमिका मुद्देसुदपणे मांडता यायला हवी, कारण भविष्यात तुम्हाला खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 9:01 am

Web Title: upsc ias interview question why are you so lean and thin sas 89
टॅग : Upsc
Next Stories
1 USB Condom ची मागणी का सातत्याने वाढतेय?
2 HDFC चे कोट्यवधी खातेधारक वैतागले, सलग दुसऱ्या दिवशी महत्त्वाच्या सेवा ‘डाऊन’
3 धुम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ कंपनीने दिली भन्नाट ऑफर
Just Now!
X