News Flash

या फोटोत किती बदकं आहेत?; हजारो जणांनी केलाय उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला जमतंय का बघा

हा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रचंड व्हायरल झालाय

‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं…’ असं म्हणतात. सध्या इंटरनेटवरही अशाच एका फोटोची तुफान चर्चा आहे. वर दिसणारा बदकांचा अगदी साधा सरळ वाटणार फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो पाहताक्षणी तो का व्हायरल होतोय, याचा अंदाज तुम्हाला बांधता येणार नाही. पण हा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवरील ट्रेण्डींग चॅलेंजपैकी आहे. अगदी उद्योगपती हर्ष गोयंका यांनाही हा फोटो ट्विटरवरुन शेअर करत आपल्या फॉलोअर्सला फोटोमध्ये नक्की किती बदल आहेत असा प्रश्न विचारला आहे.

निळ्या रंगाच्या बॅकग्राऊण्डवर इमोन्जीप्रमाणे दिसणारे काही बदक रांगेत उभे असल्याचा फोटो व्हायरल होतोय. बरं या फोटोबरोबर विचारला जाणारा प्रश्नही अगदी सोप्पा आहे. फोटोमध्ये बदकांची संख्या किती आहे?, असं हा फोटो शेअर करत विचारलं जात आहे. गोयंकांनाही असाच प्रश्न विचारत हा फोट शेअर केलाय.

अनेकजण या फोटोवर कमेंट करुन फोटोत किती बदक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात तुमच्याप्रमाणे अनेकजण अगदीच सोप्पा प्रश्न आहे असं म्हणत नऊ असं उत्तर देत असले तरी हा फोट दिसतोय तितका सरळ नाहीय. कारण या फोटोमध्ये नऊपेक्षा जास्त बदक आहेत. फोटो जरा नीट पाहिला तर या फोटोत थेट दिसणाऱ्या नऊ बदकांबरोबरच त्यांचे साथीदारही असल्याचे दिसून येतं. अर्थात नजर थोडी पक्की असेल आणि झूम करुन नीट पाहिलं तर तुम्हालाही नऊपेक्षा जास्त बदक नक्कीच या फोटोत दिसतील. गोयंका यांनी शेअर केलेल्या या फोटोवर एक हजाराहून अधिक जणांनी कमेंट केलीय. प्रत्येकाचं म्हणणं आणि त्यामागील तर्क वेगळा आहे. त्यामुळे यावर कमेंटचा नुसता पाऊस पडतोय.

आता तुम्हीही एकदा बदक मोजून पाहिले असतील तर तुम्हाला ते दहा किंवा १२ वगैरे पर्यंत असल्याचं वाटलं असेल. मात्र या फोटोत खरं तर एकूण १७ बदक आहेत. कसे ते पाहा.

यामधील काही बदकांच्या मागे अजून एक बदक आहे. या बदकाची हिंट समोर असणाऱ्या बदकाच्या पायाजवळ किंवा मानेजवळ दिसून येते. अजूनही नसेल समजलं तर हे खालील सोप्प गणित पाहा

तुम्हाला दिसेल का हे १७ बदक कमेंट करुन नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 10:22 am

Web Title: viral photo a very simple question how many ducks are in this photo scsg 91
Next Stories
1 बापरे…! ११ वर्षांचा मुलगा YouTube वर व्हिडिओ बघून शिकला हॅकिंग, नंतर वडिलांनाच अश्लील फोटो…
2 5 वर्षांचा चिमुकला वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट चालवतोय Land Cruiser, व्हायरल व्हिडिओ बघून नेटकरी हैराण
3 धक्कादायक! सुलभ शौचालयात अंडे-मटणाची विक्री, देशातल्या सर्वात स्वच्छ शहरातला प्रकार
Just Now!
X