Viral Video : लहान मुलांना कोणत्या गोष्टीवरून कधी राग येईल याचा काही नेम नाही. त्यातच त्यांचा वाढदिवस असेल की, ते अगदीच उत्साहात असतात. वाढदिवसाच्या दिवशी त्यांना नवीन कपडे, केक, भेटवस्तू या गोष्टींसाठी ते खूपच उत्सुक असतात. अशातच वाढदिवसाच्या कार्यक्रमाला तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध एक जरी गोष्ट केली, तर ते रडून कार्यक्रमात गोंधळ घालतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका चिमुकलीचा वाढदिवस असतो. तर चिमुकली केकवर लावण्यात आलेली मेणबत्ती फुकायला जाते, तितक्यात तिची मैत्रीण पुढे येते आणि मेणबत्ती विझवते आणि दोघींमध्ये मजेशीर भांडण होतं.

व्हायरल व्हिडीओ एका वाढदिवसाचा आहे. ज्या मुलीचा वाढदिवस आहे ती खुर्चीवर उभी आहे. वाढदिवसासाठी जमलेली लहान मुले आणि पालक एकत्र मिळून हॅप्पी बर्थडे हे गाणं गात आहेत. तसेच मुलगी केक कापण्यासाठी खाली वाकते आणि मेणबत्ती विझवायला जाते, तितक्यात तिच्या बाजूला उभी असलेली तिची मैत्रीण मेणबत्ती विझवते. हे बघताच चिमुकलीला राग येतो आणि ती मैत्रिणीचे केस ओढण्यास सुरुवात करते. वाढदिवस साजरा करताना चिमूल्यांचं झालेलं मजेशीर भांडण तुम्हीसुद्धा एकदा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…OMG! उकळत्या तेलात हात घालून तरुण तळतोय मंचूरियन भजी; विश्वास बसत नसेल तर..’हा’ पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

केकवर लावलेली मेणबत्ती विझवली म्हणून आला राग :

बर्थडे गर्ल (Birthday Girl ) जेव्हा केकवर लावलेली मेणबत्ती विझवायला जात असते, तेव्हा अगोदरपासूनच मैत्रिणीचं लक्ष केकवर असते आणि वाढदिवस असणारी चिमुकली जेव्हा मेणबत्ती विझवायला पुढे येते, तेव्हा ती मुद्दाम मेणबत्ती विझवते आणि दोघींमध्ये मजेशीर भांडण होतं. वाढदिवस असणारी चिमुकली अगदीच रडकुंडीला आली आहे आणि रागात तिच्या मैत्रिणीचे केस ओढताना दिसते आहे. एवढं होऊनसुद्धा चिमुकीलीची मैत्रीण हसताना दिसते आहे ; जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @crazyclipsonly या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात कोणाची चूक आहे ? असे मजेशीर कॅप्शनसुद्धा व्हिडीओला देण्यात आले आहे. बर्थडे गर्लची मैत्रीण मुद्दाम तिचा वाढदिवस खराब करते आणि तिची मजा घेताना दिसते. व्हिडीओ पाहून अनेक जण चिमुकल्यांच्या मजेशीर भांडणाचा आनंद लुटत आहेत आणि पोट धरून हसताना दिसत आहेत. तसेच एक युजर दोन्ही मैत्रिणींची इथे चूक आहे, असे आवर्जून सांगताना कमेंटमध्ये दिसून येत आहे.