Viral Video : पॅराग्लायडिंग (Paragliding) हा लोकप्रिय साहसी खेळ आहे. पॅराशूट आणि योग्य त्या सुरक्षेच्या मदतीने पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्ती या खेळाचा आनंद घेताना दिसतात. तसेच पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तींची हिम्मत अनेकांना चकित करून सोडते. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो उंच आकाशात पॅराग्लायडिंग करता करता नाश्ता करतानासुद्धा दिसून आला आहे.
व्हायरल व्हिडीओ पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका साहसी तरुणाचा आहे. तरुणाने पॅराग्लायडिंग करताना बेल्ट बॅग कमरेला लावली आहे आणि त्यात नाश्ता करण्यासाठी काही पदार्थ आणले आहेत. तरुण पॅराग्लायडिंग करताना बॅगमधून कॉर्नफ्लेक्स (Corn Fleks) बाहेर काढतो. त्यानंतर एक प्लास्टिक बाऊल काढून त्यात चमच्याने केळ्याचे तुकडे करून टाकतो. केळं कापताना एक तुकडा खालीसुद्धा पडतो. तसेच त्यानंतर तो त्यात दूध टाकतो. अशाप्रकारे तरुणाचा नाश्ता तयार होतो आणि मग तो खाण्यास सुरुवात करतो. जमिनीवर उतरण्यापूर्वी तरुण उंच आकाशात नाश्ता करताना दिसला आहे. पॅराग्लायडिंग करताना नाश्ता करणाऱ्या तरुणाचा स्टंट एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.




व्हिडीओ नक्की बघा :
उंच आकाशात केला नाश्ता :
सकाळी उठल्यावर अनेकांना नाश्ता करण्याची सवय असते. पोटभर खाल्ल्याशिवाय काहीजणांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. असंच काहीसं या व्हिडीओतसुद्धा पहायला मिळालं आहे. पॅराग्लायडिंग करताना तरुणाला भूक लागते म्हणून उंच आकाशात तरुण नाश्ता बनवताना दिसून आला आहे. तरुणाचे नाव ‘ओस्मार ओचाओ’ असे आहे. तसेच हा व्हिडीओ परदेशातील आहे. उंच आकाशात पॅराग्लायडिंग करताना तरुण कॉर्नफ्लेक्स, केळं, दूध यांच्यापासून नाश्ता बनवतो आणि मजेशीर पद्धतीने खाताना दिसतो आहे. जमिनीपासून शेकडो फूट उंच उडताना तरुण अगदी बिनधास्तपणे नाश्त्याचा आनंद घेत आहे, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल एवढं नक्कीच…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तरुणाच्या @osmar.8a या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने ‘दिवस सुरू करण्याचा उत्तम मार्ग’ अशी कमेंट केली आहे; तर अनेकजण तरुणाचा निष्काळजीपणा पाहून, तर काहीजण व्हिडीओ पाहून पोट धरून हसताना दिसत आहेत. तसेच अनेकजण तरुणाच्या हिमतीची दाद देत आहेत. पॅराग्लायडिंग करणाऱ्या अनेकजणांना सुरक्षितपणे जमिनीवर त्याचं लँडिंग व्हावं अशी इच्छा असते, पण इथे तरुण अगदी बिनधास्तपणे नाश्ता करून जमिनीवर लँडिंग करताना दिसून आला आहे.