आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही, कोण कधी आणि कसला जुगाड करेल हे सांगता येत नाही. शिवाय अनेकजण गरज म्हणून जुगाड करतात तर काही टाईमपास म्हणून. सध्या अशाच एका व्यक्तीने केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. आजकाल आपण एखाद्या दुकानात QR कोड स्कॅन करून पैसे दिल्यानंतर, एका स्पीकरमधून मोठ्याने दुकानदाराच्या खात्यात पैसे झाल्याचा आवाज येतो. त्या स्पीकरला ‘साउंड बॉक्स’ असं म्हटलं जातं. जे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांपासून मोठमोठ्या दुकांनामध्ये आपणाला पाहायला मिळतात.

या साउंड बॉक्सचे काम फक्त खात्यात जमा झालेल्या रकमेची सूचना देणे एवढेच आहे. पण सध्या एका व्यक्तीने अनोखा जुगाड केला असून त्याने PhonePe च्या साउंड बॉक्सला म्युझिक स्पीकर बनवलं आहे. त्यामुळे या स्पीकरद्वारे तुम्ही कोणतीही गाणी ऐकू शकता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर ‘फोन पे’ वाल्यांनी देखील आपल्या कोणी या स्पीकरचा असा वापर करेल याचा विचार केला नसेल, अशा कमेंट नेटकरी करत आहेत. अनेकजण यावर मजेशीर प्रतिक्रिया देत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- मुसळधार पाऊस, मंडपात गळत होतं पाणी तरीही वऱ्हाड जेवणाच्या पंगतीतून उठलं नाही; पाहुण्यांच्या अनोख्या जुगाडाचा Video व्हायरल

हेही पाहा- पठ्ठ्याने पैशांसाठी केला भन्नाट जुगाड, कोंबडीला हिरवा रंग देऊन OLX वर ६ हजार ५०० रुपयांना विकलं, बातमी वाचून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जुगाडाचा व्हिडिओ@strictlyformeme नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तो २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी याला अप्रतिम जुगाड म्हटलं आहे, तर काहींनी या स्पीकरचा गैरवापर केल्याचं लिहिले आहे. एका नेटकऱ्याने मजेशीर कमेंट केली आहे, त्याने लिहिलं आहे की, ‘फोन पे’ वाल्यांना हे पाहून धक्का बसला असेल, तर दुसऱ्याने लिहिले, “आपल्या देशात कोण कधी कसला जुगाड करेल हे सांगता येत नाही.” व्हायरल व्हिडिओमध्ये, एका दुकानात ‘फोन पे’ चा साउंड बॉक्स ठेवल्याचं दिसत आहे. ज्यावर गायक अरिजित सिंगचे ‘केरसिया तेरा इश्क है पिया….’ हे सुपरहिट गाणं सुरु आहे. यावेळी अचानक एक व्यक्ती तो बॉक्स उचलतो आणि प्रत्येक कॅमेऱ्यासमोर धरतो. वास्तविक, या साउंड बॉक्सवर एक उपकरण लावलं आहे. ज्यावर MP3 आणि FM असं लिहिल्याचं दिसत आहे.