scorecardresearch

Premium

Video : महाप्रसाद देण्यासाठी खास नियोजन… प्रसाद वाढण्यासाठी बनवली चारचाकी गाडी

मंदिरात लाखोंच्या संख्येत आलेल्या भक्तांना महाप्रसाद देण्यासाठी एक विशिष्ट चारचाकी गाडी तयार करण्यात आली आहे.

A special four wheeler has been prepared to give Mahaprasad to the devotees who come to the temple
(सौजन्य:इन्स्टाग्राम/@kamalesh98) Video : महाप्रसाद देण्यासाठी खास नियोजन… प्रसाद वाढण्यासाठी बनवली चारचाकी गाडी

Video : मंदिरात लाखो भाविक भक्तिभावाने दर्शनासाठी जातात. अनेक भक्तांसाठी काही प्रार्थनास्थळांवर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. लाखोंच्या संख्येत उपस्थित राहणाऱ्या भक्तांना एकाचवेळी मर्यादित वेळेत जेवण वाढण्यासाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. जेवण वाढण्यासाठी मोठ्या आकाराची भांडी, प्रसादाचा लाभ घेणाऱ्या भक्तांना बसण्याची व्यवस्था, पिण्यासाठी पाणी, हात धुण्यासाठी बेसिन आदी अनेक गोष्टींची सोय प्रार्थनास्थळांवर करण्यात येते. तर आज सोशल मीडियावर याच संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मंदिरात लाखोंच्या संख्येत आलेल्या भक्तांना महाप्रसाद देण्यासाठी एक विशिष्ट चारचाकी गाडी तयार करण्यात आली आहे.

गंगा नदीच्या काठी मायापूर हे धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाण आहे. श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी विशेष महत्व असलेले हे तीर्थक्षेत्र आहे; तर हा व्हायरल व्हिडीओ मायापूर येथील इस्कॉन मंदिराचा आहे. सुरुवातीला भव्य इस्कॉन मंदिराची एक झलक दाखवण्यात आली आहे. अनेक भक्त रांगा लावून प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जेवायला जमिनीवर बसले आहेत आणि भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेता यावा म्हणून पत्रावळ्या, पिण्यास पाणी देण्यात आले आहे.त्यानंतर मंदिरातील काही कर्मचारी चारचाकी गाडी घेऊन येतात. एका चारचाकी गाडीवर भाताचा मोठा टोप, तर दुसऱ्यावर पाण्याची टाकी ठेवण्यात आली. चारचाकी गाडीच्या सहाय्याने अनेक भक्तांना एकाचवेळी पिण्यासाठी पाणी दिले जात आहे आणि जेवण वाढण्यात येत आहे .

BECIL Bharti 2023
मुंबईत नोकरीची मोठी संधी! BECIL अंतर्गत विविध पदांच्या १२९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या
nashik eco friendly ganesh visarjan, nashik ganesh visarjan, nashik ganesh visarjan miravnuk, ganesh visarjan artificial lakes nashik
नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी तयारी, कृत्रिम तलावांची व्यवस्था, पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यास कारवाई
farmer made tractor run on cng
डिझेलचे पैसे वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, बनवला चक्क CNG वर चालणारा ट्रॅक्टर; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क
schoolboy throws notes for help from window in bid to escape doing homework
गृहपाठ न करण्यासाठी वापरलेल्या युक्तीमुळे पोलिस थेट पोहोचले घरी; पालकांना बसला धक्का!

हेही वाचा… Video: सियाचिन सीमेवर भारतीय जवानांनी गणरायाला दिला निरोप; जवानांनी गुलाल उधळत लेझीम अन् मराठमोळ्या गाण्यांवर धरला ठेका

व्हिडीओ नक्की बघा :

महाप्रसाद देण्यासाठी खास नियोजन :

लाखो भाविकांना एकाचवेळी महाप्रसाद देण्यासाठी प्रार्थनास्थळांवर किंवा तीर्थक्षेत्रांवर काही कर्मचारी नेमून देण्यात येतात. हे कर्मचारी दिलेल्या वेळेत प्रत्येक भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल, ही गोष्ट लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करतात. तर या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. अनेक भाविकांना एकाचवेळेस महाप्रसाद देण्यासाठी ही चारचाकी गाडी खास बनवण्यात आली आहे. तसेच, या दरम्यान कुठेही अन्न वाया जाणार नाही तसेच कुठेही अन्नाचा अपमान होणार नाही याचीसुद्धा महाप्रसाद देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kamalesh98 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि ‘भारतातील इस्कॉन मायापूरचा महाप्रसाद’ असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. महाप्रसादाचे अनोख्या पद्धतीने वाटप केलेले पाहून ‘फास्ट आणि फ्युरियस पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे’, ‘जमिनीवर मांडी घालून बसणे हा जेवायला बसण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे’ असे अनेक युजर कमेंट करताना दिसून येत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A special four wheeler has been prepared to give mahaprasad to the devotees who come to the temple asp

First published on: 25-09-2023 at 15:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×