Indore news मध्य प्रदेशातील इंदूरमधून एका विचित्र भांडणाची घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेने फक्त ढेकर दिल्यानं हा वाद झाला आणि या वादाचं हाणामारीत रुपांतर झालं, त्यानंतर हा वाद थेट पोलिसातच गेला. मध्य प्रदेशातील इंदूरमधून क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्याची घटना समोर आली असून, शेजाऱ्यांमध्ये भांडण झाल्यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. या संपूर्ण वादाची सुरुवात एका महिलेने ढेकर दिल्याने झाली, त्यानंतर बाचाबाची झाली आणि नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंच पोहोचल्याचे सांगण्यात आले.

ढेकर दिल्याने शेजाऱ्याशी भांडण

इंदूरच्या एमआयजी पोलीस स्टेशन परिसरात एक महिला ढेकर देत होती. त्यामुळे शेजारी राहणारे लोक वैतागले होते. याबाबत त्यांनी महिलेकडे तक्रार केली असता, एकच गोंधळ उडाला. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की ती महिला खूप जोरात ढेकर देत असते, त्यामुळे आम्हाला त्रास होतो. शेजाऱ्ंयानी महिलेच्या घरी जाऊन तक्रार केली असता हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले.

शुल्लक कारणावरुन हाणामारी

ढेकर देणाऱ्या महिलेचा मुलगा राहुल याने सांगितले की, आईची तब्येत ठीक नाही, तिला अॅसिडीटी आहे, त्यामुळेच ती ढेकर देते. यावर शेजारी येऊन म्हणाले, एवढा मोठा आवाज का करताय?. राहुल याने सांगितले की, आम्ही त्यांना आईच्या तब्येतीची माहिती दिली पण त्यांनी काहीही न ऐकता गोंधळ घालायला सुरुवात केली. राहुलचे वडील दिनेश सिरसीवाल यांनी पोलिसात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा – VIDEO: दिल्ली मेट्रोत ‘तो’ लेडिज डब्यात चढला, मग तरुणीची छेडछाड, महिलांनी शिकवला चांगलाच धडा

पोलिसात तक्रार दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारामारीसोबतच चाकूचा धाकही दाखवल्याचा आरोप केला गेला आहे. या सर्व भंडणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात नेले. दोन्ही बाजूंकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत की वादाचे खरे मूळ काय? ‘ढेकर’वरून दोघांमध्ये खरच भांडण झाले आहे का?