बॉलिवूड गाण्यांची क्रेझ केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे. सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यामध्ये परदेशी लोक बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमचेही मन आनंदित होईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये काही आफ्रिकन मुले प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आफ्रिकन लहान मुलांचा एक ग्रुप सलमान खानच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. . ज्या गाण्यावर ही आफ्रिकन मुले नाचताना दिसत आहेत ते सलमान खानच्या ‘पार्टनर’ चित्रपटातील ‘सोनी दे नखरे’ हे सुपरहिट गाणे आहे, ज्यावर मुलं भन्नाट नाचताना दिसत आहेत. सर्वात आधी आफ्रिकन मुलांचा व्हायरल डान्स व्हिडीओ एकदा पाहाच..

( हे ही वाचा: श्रद्धेला सीमा नाही! मंदिरात घंटा वाजवण्यासाठी चक्क कुत्र्याची हजेरी; व्हायरल Video पाहून नेटकरी म्हणतात, ”हा खरा…”)

‘सोनी दे नखरे’ गाण्यावर आफ्रिकन मुलं भन्नाट नाचली

( हे ही वाचा: Video: फिल्मी स्टाईल प्रपोज करायला गेला अन् तोंडावर पडला, तरुणीने पायाने केलेली ‘ही’ चूक पडली महागात)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओतील मुलांचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत, जे लोकांना वेड लावत आहेत. व्हिडिओमध्ये सर्व मुलांनी शाळेचा गणवेश घातलेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, याला आतापर्यंत असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत. हा अप्रतिम डान्सचा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच एक सुंदर हास्य फुलेल.