सोशल मिडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल होणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात पण सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एखाद्या व्हिडिओची दखल दिग्गज घेत असतील तर ही नक्की आश्चर्याची गोष्ट आहे.
सध्या असा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्याची दखल आधी उद्योगपती आंनद महिंद्रा यांनी घेतली होती. आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली आहे.
तुम्ही रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर फिल्म ब्रह्मास्त्रमधील “केसरिया” हे गाणे हिंदीमध्ये ऐकलं असेल मात्र एका अवलियाने हे गाणे ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये अतिशय सुरेख पद्धतीने गायले आहे. या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. या गाण्याची भुरळ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पडली आहे. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत गायकाचे कौतुक केलं आहे.
५ भाषांमध्ये केसरिया गाणाऱ्या तरुणाचे मोदींने केलं कौतुक
व्हिडिओमध्ये गाणारा हा व्यक्ती मुंबईस्थित शीख गायक स्नेहदीप सिंग कलसी आहे, ज्याने मल्याळम, तामिळ, कन्नड, तेलगू आणि हिंदी या ५ भाषेत ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया हे गाणे गायले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधानांनी ट्विट केले की,: “प्रतिभावान स्नेहदीप सिंग कलसीने हे अप्रतिम सादरीकरण केले. सुरांव्यतिरिक्त, हे “एक भारत श्रेष्ठ भारत” च्या भावनेचे उत्कृष्ट प्रकटीकरण आहे. “उत्तम!”
काय आहे ही ”एक भारत श्रेष्ठ भारत” मोहीम?
भारत सरकारने सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर करण्यासाठी “एक भारत श्रेष्ठ भारत” नावाची मोहीम आणि नाराही तयार केला. अधिकृत वेबसाइटनुसार, या कार्यक्रमाचा उद्देश राज्य-ते-राज्य जोडणीच्या संकल्पनेद्वारे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकांमधील परस्पर समन्वय वाढवणे आणि परस्पर समज वाढवणे आहे. भाषा शिक्षण, संस्कृती, परंपरा आणि संगीत, पर्यटन आणि पाककृती, खेळ आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण इत्यादी क्षेत्रात शाश्वत आणि संरचित सांस्कृतिक संबधांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्ये हा उपक्रम राबवतात.
“वृद्ध व्यक्ती पूजा करताना बिबळ्या बसून पाहतोय हे पाहून..” फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रांनी लिहिली अनोखी कॅप्शन
स्नेहदीपने मानले मोदींचे आभार
हे सुंदर गाणे गाणाऱ्या स्नेहदीपने देखील पंतप्रधान मोदींनी केलेल्या कौतुकाची पोस्ट रिट्विट केली आहे आणि पिन केलेल्या ट्विटमध्ये त्यांचे आभार मानले. “सर, कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी हे खुप महत्त्वाचे आहे. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि तुम्हालाही तो आवडला याबद्दल खूप आनंद झाला ” असे त्याने लिहिले आहे.