महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या बैठका आणि कामांनिमित्त सध्या कोकण दौऱ्यावर असणाऱ्या अमित ठाकरेंनी आज रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना डांबून ठेवण्यात आलं होतं त्या कोठडीला भेट दिली. यासंदर्भातील माहिती अमित यांनीच फेसबुकवर एका खास पोस्ट शेअर करत दिली आहे. आपल्या भावनिक पोस्टमधून अमित यांनी ही जागा महाप्रचंड बळ देणारी असल्याचं म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: धबधबे, हिरवळ, ओढे अन्… स्पेशल व्यक्तीसोबत अमित ठाकरेंचं आंबोलीत ट्रेकिंग; कोकणचा निसर्ग पाहून म्हणाले, “मी इथे…”

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आग्रहास्तव आपण या कारागृहामधील सावरकर कक्षाला भेट दिल्याचं अमित यांनी म्हटलंय. “रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात भेटायला आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी अमेय पोतदार यांच्या आग्रहास्तव रत्नागिरी विशेष कारागृहात गेलो. तिथल्या सावरकर स्मृती कक्षात गेल्यानंतर, त्या कोठडीचा इतिहास जाणून घेतल्यानंतर शहारून गेलो,” असं अमित ठाकरेंनी या भेटीबद्दल सांगताना म्हटलंय.

नक्की वाचा >> नितेश राणे- अमित ठाकरेंची राणेंच्या कणकवलीमधील घरी भेट; नितेश यांनी शेअर केलेल्या फोटोची कॅप्शन चर्चेत

सावरकरांना डांबून ठेवण्यात आलेल्या त्याच अंधाऱ्या खोलीमध्ये आपण काही मिनिटांसाठी उभे होतो आणि ती जागा फार प्रेरणादायी असल्याचं अमित पोस्टमध्ये पुढे लिहितात. “अंदमानला काळया पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी १९२१ ते १९२३ अशी दोन वर्षं ज्या तुरुंगाच्या अंधाऱ्या खोलीत दंडा-बेडी लावून डांबून ठेवलं होतं, त्याच जागी काही मिनिटं मी उभा होतो,” असं शब्दांमध्ये अमित यांनी हा कोठडीचं वर्णन केलंय.

नक्की वाचा >> धबधब्यासमोर काढलेले फोटो शेअर करत अमित ठाकरे म्हणाले, “कोकणासारखं निसर्ग सौंदर्य परदेशात आपल्याला…”

अमित ठाकरेंनी या कारागृहाला कोकणात येणाऱ्यांनी भेट द्यायला हवी असं आवाहन केलंय. “कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी या कारागृहातल्या सावरकर स्मृती कक्षाला भेट द्यायलाच हवी. इथे आपला इतिहास आहे. जुलुमाविरोधात लढण्याचं महाप्रचंड बळ देणारी प्रेरणा इथे आहे. त्या प्रेरणेचं नाव – स्वातंत्र्यवीर सावरकर,” असं अमित ठाकरेंनी म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारीच अमित ठाकरे हे कणकवलीमध्ये खासदार नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट द्यायला गेलेले. यावेळेस नितेश राणे यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. नितेश राणे यांनीच हा भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.