बिबळ्या हा वाघाच्याच प्रजातीतला एक भयंकर प्राणी आहे. तो समोर दिसला तरीही भीती वाटते. अनेकदा लोक घाबरून बिबळ्याला ठार करतात. मात्र त्याची दहशत काही कमी झालेली नाही. देशातल्या अनेक भागात बिबळ्या आल्याची बातमी कुठे तरी येतेच. तसंच या बिबळ्याचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आनंद महिंद्रांनी शेअर केला आहे. आनंद महिंद्रांनी पोस्ट केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.

काय आहे आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोत?

या फोटोमध्ये हे दिसतं आहे की एक मोठा डोंगर आहे. त्या डोंगराजवळच एक मंदिर आहे. या मंदिरात एक वृद्ध व्यक्ती पूजा करते आहे. तर बिबळ्या वर बसला आहे आणि तो त्या पूजा करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला न्याहाळतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो राजस्थानच्या पाली जिल्ह्यात असलेल्या जवाई हिल्सचा आहे. या ठिकाणी असलेल्या बेरा गावातल्या डोंगर रांगा या पँथर हिल्स म्हणून ओळखल्या जातात. या फोटोत महत्त्वाची बाब ही की बिबळ्या शांत बसला आहे. माणूसही शांतपणे पूजा करतो आहे. दोघांमधला संघर्ष या ठिकाणी बघायला मिळत नाही.

आनंद महिंद्रांनी काय म्हटलं आहे?

आनंद महिंद्रांनी हा फोटो ट्विट केला असून त्याला कॅप्शन दिलं आहे. त्यात आनंद महिंद्रा म्हणतात मला हा फोटो जगाच्या बँकिंग व्यवस्थेची आठवण करून देतो आहे. आनंद महिंद्रांनी केलेलं हे ट्विट हजारो नेटकऱ्यांनी रिट्विट केलं आहे. तसंच अनेक नेटकरी या ट्विटवर रिप्लायही देत आहेत. विविध प्रतिक्रिया या फोटोवर येत आहेत. आनंद महिंद्रांनी ट्विट केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.