Viral video: आषाढी एकादशीला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. आज ५ जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या पंढरपुरात दाखल होतील. त्यापूर्वीच विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं दिसून येत आहे. एकादशीच्या दोन दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. अशात ते पंढरपूरी जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स करताना दिसतात. या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काही सीमा नसते. अनेक तरुणही या वारीत सहभागी होतात तर दुसरीकडे म्हातारो आजी-आजोबा आपल्याला या वारीत दिसतात. दरम्यान असेही काही लोक असतात ज्यांना वारीत सहभागी व्हायचं असतं मात्र कामामुळे कर्तव्यामुळे त्यांना वारीचा अनुभव घेता येत नाही. मात्र म्हणतात श्रद्धा असेल तर विठ्ठल कोणत्याही रुपात दर्शन देतो. अशाच एका डॉक्टरांना विठ्ठलाने हॉस्पिटलमध्येच कसं दर्शन दिलं पाहा.
अनेक जण आपल्या कामातच देवाची भक्ती किंवा आनंद शोधत असतात. संत सावता माळी यांनी आपल्या अभंगात, “माळी-काम करी, विठ्ठल स्मरी” असे म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की, माळी आपल्या कामात, म्हणजेच बागेत काम करताना देवाला म्हणजेच विठ्ठलाला अनुभवतो. म्हणजेच, आपल्या कामातच मन रमवून, त्यात आनंद शोधल्यास, देव आपल्या आजूबाजूलाच आहे, असे वाटते. हाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून येतो. विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो, अशी वारकरी संप्रदायात श्रद्धा आहे. विठ्ठलाला ‘भगवंत’ मानले जाते, आणि तो आपल्या भक्तांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो, असे मानले जाते. त्यामुळे, तो कधीही, कोणत्याही रूपात प्रकट होऊ शकतो, असा लोकांचा विश्वास आहे. असंच या व्हिडीओतून समोर आलं आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हॉस्पिटलमध्ये आजोबा चंदनाचा टिळा लावून बेडवर झोपले आहेत, आणि याच आजोबांची सेवा करताना डॉक्टरांना विठ्ठल भेटला आहे. यावर ते म्हणतात, “माफ कर विठ्ठला वारी जरी चुकली असेल तरी या वारकऱ्यांची अशी सेवा कायम करत राहीन”आपण जे म्हणतो, “माणसात देव” म्हणजे माणसांमध्ये चांगुलपणा, दयाळूपणा, प्रेम, सहानुभूती आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती यांसारखे दैवी गुणधर्म असू शकतात. त्यामुळे, देव फक्त मंदिरांमध्ये किंवा मूर्तींमध्ये नसून, तो माणसांमध्येही असू शकतो.
पाहा व्हिडीओ
अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा असणारा विठ्ठल महाराष्ट्राचे दैवत म्हणून ओळखला जातो.सध्या विठ्ठलाच्या नामाचे संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून निघालाय. अशातच हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.