Bike Accident Viral Video : रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओ अतिशय भयंकर धडकी भरवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बाईक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये तीन मित्र बाईकवरून कुठे तरी जात होते. यावेळी बाईक चालविणाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बाईक नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट नाल्यात जाऊन पडली. पण, या अपघातात सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे बाईकसह तीन मित्र नाल्यात कोसळणार इतक्यात एकाने मात्र मोठ्या चलाखीने आपला जीव वाचवला. जणू त्याने हिंमत दाखवत मृत्यूलाही चकवा दिला; पण त्याचे दोन मित्र मात्र बाईकसह थेट नाल्यात कोसळले. या भयंकर अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रस्त्यावर गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, अशा सूचना वेळोवेळी दिल्या जातात; पण बहुतांश बाईकचालक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघातात बळी पडतात. या व्हिडीओतही अशीच दुर्घटना घडली. चालकाने समोरून गाडी येत असल्याचे पाहताच कट घेण्यासाठी म्हणून आपल्या बाईकचा स्पी़ड वाढवला; पण यात त्यालाच मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. परंतु, येणारे संकट लक्षात घेऊन, त्त बाईकवर सर्वांत मागे बसलेल्या तरुणाने पटकन चलाखी दाखवत आपला जीव वाचवला.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बाईकवरून तीन मित्र कुठेतरी जात होते. यावेळी अचानक चार रस्त्यांच्या एका बाजूने एक व्हॅन येत असते. याच व्हॅनला कट मारून जात असताना बाईकसह दोघे थेट नाल्यात कोसळतात; पण बाईकच्या मागे बसलेला तरुण मात्र अतिशय चलाखीने आपला जीव वाचवतो. एका अरुंद पुलावरून ते नाल्यात कोसळतात; पण बाईक पडत असतानाच सर्वांत मागचा लगेच पुलाच्या रेलिंगला पकडतो. रेलिंगचा आधार घेत, तो पुलावर येऊन उभा राहतो आणि त्यामुळे तो एकटा वाचतो; पण त्याचे मित्र नाल्यात वाहून जातात. जर त्याने जीव वाचविण्यासाठी स्वबुद्धीचा योग्य वेळी योग्य असा वापर केला नसता, तर तोही नाल्यात पडला असता.
ही घटना व्हिएतनाममधील असल्याचे सांगितले जात आहे, जी रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
भीषण अपघाताचा हा व्हिडीओ एक्सवर @garrywalia_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून सर्वच चकित झालेत. त्यात एकाने ज्या प्रकारे आपला जीव वाचवला त्याचे कौतुक केले गेले आहे. एका युजरने लिहिले की, तुम्ही काहीही म्हणा, या माणसाच्या बाजूने धाडस आणि नशीब दोन्ही होते. तर दुसऱ्याने लिहिले की, हा माणूस थोडक्यात बचावला. तिसऱ्याने लिहिले की, याला म्हणतात मेंदूचा हुशारीने वापर करणे.