Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुले स्टंटबाजी करताना दिसत आहे. यावेळी ते स्टंटबाजीमुळे ते रस्त्यावर तोंडघशी पडले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

तरुणांनी काय केलं पाहा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तीन जण दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. रस्त्यावरही पावसाचे पाणी दिसत आहे. दरम्यान, दुचाकीवरून जाणारा एक तरुण रस्त्यावरून पुढे येतो.त्याच्या मागे आणखी दोन जण दुचाकीवरच आहेत. रस्त्यावर एक मुलगा पुश अप करताना दिसत आहे. तेवढ्यात बाईक चालवणारा मुलगा समोरून बाईक घेऊन येतो. आणि स्टंट करण्याचा प्रयत्न करत असताना तो बाईकचा पुढचा टायर हवेत उचलतो.मात्र रस्त्यावरील पावसाच्या पाण्यात दुचाकीचा टायर घसरतो आणि दुचाकीवर नियंत्रण सुटतं. आणि तिघेही जोरात रस्त्यावर पडतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबई लोकलमध्ये “वाटाण्याचा गोल दाणा पोरी…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

“जीव एवढा स्वस्त असतो का रे?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ५.५७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांकडून अनेक कमेंट्सही येत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘काय गरज होती भावा !’. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘लोकांना प्रभावित करण्यासाठी आणखी स्टंट करा.’ आणखी एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले की, ‘हे लोक पडले आहेत की हा स्टंट आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले आहे की, “जीव एवढा स्वस्त असतो का रे? हे तारुण्यातलं गरम रक्त नंतर पश्चाताप करायला भाग पाडतं”