AFG vs SL One-Off Test:  कोलंबो स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट संघात कसोटी सामना खेळला जात आहे. पण, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अशी एक नाट्यमय घडामोड घडली, ज्यामुळे या सामन्यापेक्षा त्याच घटनेची जास्त चर्चा रंगली. श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघाच्या सामन्यादरम्यान अचानक एका भल्यामोठ्या घोरपडीने एन्ट्री घेतली, ज्यामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला. लाईव्ह सामना सुरू असताना पंचांचे मैदानात सरपटत येणाऱ्या घोरपडीकडे लक्ष गेले. त्यानंतर सावध होत हा सामना थांबवण्यात आला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेमुळे मैदानात थोडा वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी मैदानात उपस्थित काही जण ही घोरपड पाहण्यासाठी पुढे आले.

श्रीलंका संघाची फलंदाजी सुरू असताना कोमोडी ड्रॅगन जातीच्या घोरपडीने मैदानात एन्ट्री घेतली. यावेळी बाउंड्रीजवळील अंपायरचे लक्ष त्या घोरपडीकडे गेल्यानंतर सामना काही वेळ थांबवण्यात आल्या. यावेळी मैदानातील कॅमेऱ्यांचा फोकसही या घोरपडीच्या दिशेने गेला. दरम्यान, काही वेळाने घोरपडीला रेस्क्यू केल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. श्रीलंकेतील क्रिकेट मैदानात अशाप्रकारे एखाद्या प्राण्याची एन्ट्री होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीदेखील एका सामन्यादरम्यान मैदानात साप दिसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या कसोटीच्या पहिल्या डावात अफगाणिस्तानला १९८ धावांत ऑल आऊट केल्यानंतर श्रीलंकेने १०० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे, यामुळे श्रीलंकेची धावसंख्या ३०० च्या वर पोहचली आहे. यावेळी श्रीलंकेचा सलामवीर दिमुथ करुणारत्ने आणि निशान मदुष्का यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला.