वेगवेगळ्या मॉल्समध्ये अनेकजण एस्केलेटर म्हणजेच स्वयंचलित पायऱ्यांचा वापर करतात. अनेकजण जर उत्साहाच्या भरात त्यावर स्टंटही करतात. इतकेच नाही तर अनेकजण सोबत आणलेल्या लहान मुलांकडेही यावरून जाताना फार लक्ष देत नाहीत. लहान मुलं नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असतात. मौजमजा करताना अनेक वेळा त्यांना अशा धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील ज्यात खेळताना मुलाचे काही वाईट झाले असेल. आता अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. प्रत्यक्षात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाने खेळताना जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे.

व्हिडिओमध्ये एक लहान मूल एस्केलेटरवर चढताना दिसत आहे. या दरम्यान तो एस्केलेटर आणि भिंत यांच्यातील गॅपमध्ये डोके ठेवतो आणि एस्केलेटर पुढे सरकते तसं तो मुलगाही त्यात अडकतो. सुरुवातीला काय घडत आहे हे कोणाच्याही लक्षात येत नाही. मात्र, मुलाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याला त्रास होत असल्याचे पाहून त्याचे डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, दुसरी व्यक्ती एस्केलेटर थांबवते. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवण्यात आले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: मुलीचे अपहरण होणार होते! कुत्र्याने असा शिकवला धडा, अपहरणकर्ता क्षणात सुसाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनमध्ये घडली घटना

त्यानंतर मुलाला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंत तोडून एस्केलेटरचा हँडरेल काढला. बऱ्याच प्रयत्नांनंतर मुलाचे प्राण वाचले. दरम्यान ही घटना चीनच्या हेनान प्रांतातील जिन्यांग शहरात घडली. बराच वेळ डोक अडकलेलं असल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता. नंतर सुखरूप बाहेर काढल्यानंतर जवानांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.