सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शालेय विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘बटरफ्लाय, बटरफ्लाय’ गाण्याने सर्वांनाच वेड लावले आहे. त्यामुळे हे गाणे सध्या इन्स्टाग्रामवर चांगलेच ट्रेंड होतेय. अनेक जण त्याच्यावर मजेशीर व्हिडीओ बनवीत आहेत. अशाच दिल्ली पोलिसांनीही या ट्रेंडिंग गाण्याचा वापर करीत स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना एक चांगला मेसेज दिला आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या एक्स अकाउंटवर (पूर्वीचे ट्विटर) भररस्त्यात चालत्या स्कुटीवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा एका खतरनाक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टवर त्यांनी मजेशीर पद्धतीने एक मेसेज दिला आहे; जो वाचून कोणालाही हसू येईल. सध्या दिल्ली पोलिसांचे हे ट्वीट आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

दिल्ली पोलीस सोशल मीडियावर अनेकदा अशा मजेशीर पोस्ट करीत असतात. त्यांच्या पोस्ट अनेकदा खूपच चर्चेचा विषय ठरतात. दिल्ली पोलिसांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर पुन्हा एकदा अशीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे; जी युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. रस्ते वाहतूक सुरक्षेबरोबर सुरक्षित ड्रायव्हिंगचा मेसेज देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण एका स्कुटीवरून भरधाव वेगाने जात आहेत, यावेळी एक तरुण संपूर्ण शरीर मागे करून स्टंट करतोय; ज्यामुळे स्कुटी चालविणाऱ्या तरुणाचा तोल जातो आणि दोघे थेट रस्त्याकडील झुडपात जाऊन पडतात. हा व्हिडीओ शेअर करीत पोलिसांनी मजेशीर ढंगात, बटरफ्लाय, बटरफ्लाय.. रोड स्टंट, असे म्हटले आहे. ही अशी गोष्ट आहे की, जी तुम्ही कधीही करण्याचा प्रयत्न करू नका!

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच
kid making sandwich for grandpa viral video
गोंडस चिमुकल्या शेफने बनविले आजोबांसाठी सॅण्डविच! व्हायरल Video पाहून तुम्हीही कराल कौतुक…

या व्हिडीओवरही त्यांनी एक मजेशीर मेसेज लिहिला आहे आणि तो म्हणजे दोन चाकांवर बटरफ्लाय बनण्याचा प्रयत्न करू नका. कारण- त्यामुळे तुम्ही उडू तर शकणार नाहीच; पण पडणार हे निश्चित आहे. त्यामुळे सावधपणे गाडी चालवा. -सूचना लोकहितार्थ जारी.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. अनेकांना ही पोस्ट फारच आवडली आहे.