scorecardresearch

सर्जरीच्या आधी छवीने हॉस्पिटलमध्ये केलेला डान्स सोशल मीडियावर Viral; नेटकऱ्यांनी केलं भरभरून कौतुक

आजाराशी झुंज देत असूनही, ती जीवनाबद्दल आशावादी आहे आणि तिने रुग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

chhavi
नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये छवी हॉस्पिटलच्या खोलीत डान्स करताना दिसत आहे. (Photo : Instagram/@chhavihussein)

अभिनेत्री छवी मित्तलने या महिन्याच्या सुरुवातीला खुलासा केला होता की तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. तेव्हापासून ती तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्ससोबत तिच्या कॅन्सरच्या लढाईबद्दलचे अपडेट्स नियमितपणे शेअर करत आहे. कर्करोग हा धोकादायक आजार असून उपचारादरम्यान खूप काही सहन करावे लागते. या आजाराबद्दल सामान्यत: लोक घाबरतात, परंतु छवीने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. आजाराशी झुंज देत असूनही, ती जीवनाबद्दल आशावादी आहे आणि तिने रुग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये छवी हॉस्पिटलच्या खोलीत डान्स करताना दिसत आहे. छवीने रविवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बॉप डॅडीवर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. छवीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेची तयारी करण्यापूर्वी डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले. मग तिने नाचायचे ठरवले. तिने म्हटलं, “डॉक्टर म्हणाले, छवी तुला रिलॅक्स राहण्याची गरज आहे. तर मी चिल करतेय. #preppingforsurgery”

Woman married pet cat: महिलेने आपल्या पाळीव मांजरींसोबतच केले लग्न; कारण जाणून व्हाल थक्क

दोन पायलट्सनी हवेतच केली विमानांची अदलाबदल अन्; घटनेचा Video Viral

छवीने व्हिडीओसोबत लिहिले आहे की, “उद्या सकाळची तयारी करत आहे.” यासोबतच तिने डोळे बंद केलेल्या माकडाचा इमोजी देखील शेअर केला आहे. या पोस्टला तिच्या चाहत्यांनी आणि मित्रांना खूप पसंती दिली आहे. तसेच त्यांनी तिला शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला छवीने इंस्टाग्रामवर तिच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल खुलासा केला होता. तिने लिहिले, “मला यातून जाणाऱ्या महिलांची संख्या पाहून भीती वाटते. जर मी महिलांना कर्करोग लवकर शोधण्यात मदत करू शकले तर… स्तनाच्या कर्करोगाशी लढा देणाऱ्या महिलांसाठी भावनिक आघात हे एक आव्हान आहे. मला महिलांना दाखवून द्यायचे आहे की भावनिकदृष्ट्या तुटण्याची इतकीही गरज नाही. तुम्हाला सकारात्मक राहावे लागेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhavi dance in hospital before surgery goes viral on social media netizens appreciated pvp

ताज्या बातम्या