Ram Mandir: अयोध्येत पाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भव्य राम मंदिरात भगवान श्रीराम विराजमान झाले आहेत. जगभरातील रामभक्तांना हा ऐतिहासिक क्षण ‘याचि देही याची डोळा’ पाहता आला, मनात साठवून ठेवता आला, रामलल्ल्याच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भारतासह जगभरात उत्साहाचे वातावरण होते. या सोहळ्यानंतर अनेकांनी आनंद साजरा केला. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात चक्क ढोल वाजवून आपला आनंद साजरा केला.
…अन् मुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांबरोबर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा टीव्हीवर लाईव्ह पाहिला, यानंतर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोपिनेश्वर मंदिरात कार्यकर्त्यांबरोबर ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा एकच जयघोष केला.
‘राम आएंगे’ गाण्यावर शिक्षिकेने विद्यार्थ्यांसह केले नृत्य; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ
शेअर बाजार ते इस्कॉन मंदिर; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त ‘या’ ठिकाणी साजरी झाली ‘राम दिवाळी’
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोद्धेतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर नव्हते. मात्र, पुढील महिन्यात ते पक्षाचे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना घेऊन राम दर्शनासाठी जाणार आहेत.