Couple Viral Video : प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. हे नातं जगावेगळं असतं. या नात्यात जितकं प्रेम असतं तितकीच काळजी, तितकंच सुखदेखील असतं.
आपल्या जोडीदाराच्या मनातलं न सांगता कळणं म्हणजेच प्रेम. या नात्यात सगळंच कसं सहज सोप वाटू लागतं. पण आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणं म्हणजे नशीबच समजायचं. आपल्या आवडीच्या माणसाचा क्षणभर सहवास जरी लाभला तरी तो हवाहवासा वाटतो. या नात्यात फक्त प्रेम आणि प्रेमाची अपेक्षा असते आणि दोन्ही बाजूने प्रेम जर समान असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.
कपलचा व्हायरल व्हिडीओ (Couple Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून प्रेमात कधीही परिस्थिती पाहिली जात नाही, हे कळून येईल. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक जोडप आपलं कर्तव्य पार पाडतानासुद्धा वैयक्तिक आयुष्य जगत आहे. एकीकडे आपण पाहतो, की हल्लीच्या नात्यांमध्ये वेळ न देणे ही तक्रार जास्त प्रमाणात ऐकायला मिळते. या सगळ्यात हे जोडप सध्या आदर्श ठरतंय. व्हिडीओत आपण पाहू शकतो की एका बसमध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आपला वेळ एकत्र घालवताना दिसतायत. पण यात काहीतरी खास आहे. कारण ही बस तो मुलगा स्वत: चालवतोय. बसचालक त्याच्या कामाच्या वेळेतही आपल्या जोडीदाराला साथ देताना दिसतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल १८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तर “प्रेम वेळ किंवा परिस्थिती बघून केलं जात नाही” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जोडीदार असावा तर असा” तर दुसऱ्याने “याला म्हणतात आदर्श कपल” अशी कमेंट केली.