David Warner Viral Video : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. वॉर्नर त्याच्या जबरदस्त डान्स शैलीत चाहत्यांचं नेहमीच मनोरंजन करत असतो. भारतातही त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. गेल्या काही दिवसांपून ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या मैदात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना रंगला होता. या पहिल्या कसोटी सामन्यात चाहत्यांनी वॉर्नरला पुष्पा चित्रपटातील डान्स स्टेप्स करण्यासाठी विनंती केली. वॉर्नरनेही चाहत्यांचा विनंतीला मान देत मै झुकेगा नही या लोकप्रिय डायलॉगची झालेली स्टेप करुन दाखवली. क्रिकेट मैदानातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मैदानात ऑस्ट्रेलियाचं क्षेत्ररक्षण सुरु असताना वॉर्नर डान्स करत असल्याचं दुसऱ्या एका व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. वॉर्नरला डान्स करताना पाहिल्यावर चाहत्यांनी चिअर अप केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पहिला कसोटी सामना पाहण्यासाठी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या मैदानात हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. क्रिकेटचा सामना पाहतानाच डेव्हिड वॉर्नरने क्रिकेटप्रेमींचं मनोरंजनही केलं.

नक्की वाचा – Viral Video : पाकिस्तानी तरुणीला पाहताच प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या, ‘लैला मै लैला’ गाण्यावर अशी काही थिरकली…

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरलाही ऑस्ट्रेलिया संघाला विजयाच्या दिशेनं नेता आलं नाही. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माने १२० धावा कुटल्या. अक्षर पटेल (८४), तर रविंद्र जडेजाने ७० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे १७७ आणि ९१ धावाच केल्या.