Mom Tries Weed Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारी कठोर आई आणि तिचे तेहसा तेच नेहमीचे टोमणे आपण अनेकदा ऐकले असतील. वेगवेगळ्या सणाला, कार्यक्रमाला, घरी पाहुणे आल्यावर, मुलांना शाळेत सोडायला जाताना, गोव्यात पार्टीला गेल्यावर आईचे रूप दाखवण्याचा प्रयत्न अनेक इंस्टाग्राम क्रिएटर्सने दाखवले आहे. पण आता सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा आईचे एक भलतेच रूप दाखवत आहे. एका इंस्टाग्राम क्रिएटरने स्वतःच्या आईला तिच्याच ४५ व्या वाढदिवसाच्या निमित्त चक्क गांजा ओढायला दिला होता. अस्सल भारतीय ढंगाची आई या गांज्यामुळे नंतर जे काही करू लागली ते बघून नेटकरी सुद्धा थक्क होत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर टीका सुद्धा केलीये पण बहुतांश जण याची मजा घेत आहेत. तुमचं मत काय हे ठरवण्यासाठी आधी हा व्हिडीओ नेमका काय आहे हे पाहूया…
इंस्टाग्रामर रिषभ नंदाने आपल्या आईचा वाढदिवस थायलंड मध्ये सेलिब्रेट केला यावेळी गांजा घेतल्यावर आईने एकावर एक गुगली टाकायला सुरुवात केली. रस्त्याने चालत असताना “मला असं वाटतं की मी राणी आहे, माझी आजी म्हणायची की स्वतःला नेहमी बेस्ट समजायचं ते मी खूप सिरियसली घेतले आहे. मी आहेच बेस्ट आणि आता इथे माझ्यासाठी एवढी सजावट केलीये. मध्ये जिराफ सुद्धा उभा आहे” अशा प्रकारचा मजेशीर परफॉर्मन्स या देशी मॉमने दिला होता. मध्येच ही महिला आपल्या पतीला शोधायला लागते आणि जेव्हा तो दिसत नाही तेव्हा चक्क ” जाऊदे आपण आता पुढे जाऊन दुसरा नवरा शोधू” असं म्हणून ती हसू लागते.
Video: आईने घेतला गांजा आणि मग…
हे ही वाचा<< आनंद महिंद्रांनी दाखवलं गाडीची काच खाली केल्यावर नेमकी कुठे जाते? Video पाहून म्हणाल, “काय डोकं लावलंय”
दरम्यान, अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून काकी म्हणजे स्वर्गातच आहेत असे म्हणत कमेंट केल्या आहेत. यातील नशेचा भाग सोडल्यास प्रत्येक आईला आपण खरोखर राणी आहोत असे वाटायलाच हवे यावर सर्वांचे एकमत झाले आहे. अनेकांनी या महिलेला किती गोड आणि खेळकर आहे असे म्हंटले आहे. प्रत्येक आईचे हास्य असेच कायम टिकवून राहिले पाहिजे असेही काहींनी लिहिले आहे.