जंगलातील प्रत्येक प्राण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे; जे त्या प्राण्याला आणखीन खास करतात. आज गेंडा या प्राण्याबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे. गेंडा या प्राण्यांच्या समूहाला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? नाही; तर आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यात त्यांनी गेंड्यांच्या समूहाला काय म्हणतात हे सांगून गेंडा या प्राण्याचं वैशिष्ट्यसुद्धा सांगितलं आहे.
आयएफएस अधिकारी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जंगलातील आहे. आजूबाजूला अनेक झाडं आहेत आणि मधोमध एक तळं आहे. तळ्यात गेंडा हा प्राणी दिसत आहे. काही गेंडे पाण्यात, तर काही जण इथे-तिथे फेरफटका मारताना दिसत आहेत. या गेंड्यांच्या समूहाचा व्हिडीओ शेअर करून, त्यांनी खास कॅप्शन दिली आहे. गेंड्यांच्या समूहाला काय म्हणतात, तसेच या प्राण्याचे वैशिष्ट्य कॅप्शनमध्ये सांगितले आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेली ही पोस्ट तुम्हीसुद्धा बघाच…
हेही वाचा…Video: ट्रॅव्हल बॅगशी संबंधित ‘हा’ उपाय करेल तुमचे काम सोपे!
पोस्ट नक्की बघा :
भारतीय वनाधिकारी परवीन कासवान यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, गेंड्यांच्या समूहाला ‘क्रॅश’, असे म्हणतात. तसेच या समूहाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, हे प्राणी सहसा एकटंच राहणं पसंत करतात. जेव्हा या प्राण्यांना मुलं होतात त्याव्यतिरिक्त हा प्राणी एकटाच राहणं पसंत करतो, असं गेंड्याचं खास वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं आहे. तसेच गेंड्यांचा समूह तळ्यात आनंद लुटत आहे आणि ते दृश्य पाहून ते ‘पूल पार्टीचा’ आनंद घेत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे आणि या क्षणाचा व्हिडीओ त्यांनी मोबाईलमध्ये काढून शेअर केला आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @praveenkaswan यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच गेंडा या प्राण्याचं वैशिष्ट्य आणि त्याच्या समूहाला ‘क्रॅश’, असं म्हणतात हे त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे आणि ही माहिती पोस्टद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे. गेंड्यांच्या समूहजीवनातील आनंददायी क्षण टिपणारा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.