IPL 2025 Electric SUV Specifications Price: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चा अंतिम सामना उद्या म्हणजेच मंगळवारी (३ जून) होणार आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेतील चुरशीच्या होणाऱ्या या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२५ मध्ये यंदाही मैदानात खेळाडूंच्या दमदार कामगिरीसाठी खास पुरस्कारांची रेलचेल असणार आहे. यंदा ज्याचा स्ट्राइक रेट संपूर्ण हंगामात सर्वाधिक असेल, त्या भाग्यवान खेळाडूला ‘Curvv Striker of the Season’चा मान आणि त्यासोबत त्याला बक्षीस म्हणून Tata Motors ची नवीन प्रीमियम इलेक्ट्रिक SUV Tata Curvv EV दिली जाणार आहे.

गेल्या हंगामात Tata Punch EV ही कार ‘Striker of the Season’ जिंकणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्क याला गिफ्ट म्हणून मिळाली होती. त्याच परंपरेला पुढे नेत यंदा Tata Curvv EV ला आयपीएल २०२५ ची अधिकृत कार म्हणून घोषित करण्यात आली आहे.

Tata Curvv EV ची वैशिष्ट्यं आणि रेंज

Tata Curvv EV ही SUV-कूपे स्टाईलमध्ये सादर करण्यात आलेली एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार आहे. त्यामध्ये दोन बॅटरी पॅकचे पर्याय देण्यात आले आहेत – ४५ kWh व ५५ kWh. या कारने छोट्या बॅटरीद्वारे ५०२ किमी, तर मोठ्या बॅटरीद्वारे तब्बल ६०० किमीपर्यंतचा पल्ला गाठता येऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे.

Tata Curvv EV भन्नाट फीचर्स

या कारची १२.३ इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, १२.२५ इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ९-स्पीकर JBL साउंड सिस्टीम, पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स व वायरलेस फोन चार्जर अशी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत. एकूणच ही कार केवळ वाहन नसून, या कारमधून लक्झरी अनुभव मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Tata Curvv EV किंमत आणि व्हेरिएंट्स

Tata Curvv EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १७.४९ लाखांपासून सुरू होते; तर टॉप मॉडेल २२.२४ लाखांपर्यंत जाते. ईव्ही सबसिडी व डीलरशिप ऑफर्समुळे ग्राहकांसाठी ती आणखी परवडणारी ठरू शकते. आता आयपीएल २०२५ मध्ये ‘Curvv Striker of the Season’चा किताब आणि ही अफलातून आलिशान इलेक्ट्रिक SUV नेमकी कोण पटकावणार ते पाहणं खूपच रोचक ठरणार आहे.