अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळा मजकूर लिहिलेल्या पाट्या, पोस्टर्स व्हायरल होत असतात. तसंच अनेकदा ट्रक, टेम्पोच्या मागे हॉर्न ओके प्लीज, तर रिक्षा, टॅक्सीच्या मागे एखादी शायरी; तर बाईक, सायकलच्या मागेही काही ना काहीतरी लिहिलेलंच असतं. तसंच पुणेरी पाट्यादेखील सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. पुणेकरांच्या या पुणेरी पाट्या जितक्या वाचायला मजेशीर असतात, तितक्याच त्या खोचकपणे चांगला संदेश देऊन जातात.

तसंच आजकाल रस्त्यावर पोस्टर बॉयदेखील चर्चेत आहेत. हे पोस्टर बॉय कुठे रेल्वेस्थानकाजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी उभे असतात. या पोस्टरवर एक खास संदेश लिहिलेला असतो, जो अनेकदा मजेशीर तर अनेकदा गंभीर असतो. पण, सध्या एक वेगळाच मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणाच्या टी-शर्टवर असा मजकूर लिहिलाय, जो वाचून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल…

टी-शर्टवर काय लिहिलंय पाहा…

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक टी-शर्ट घातलेला माणूस पाठमोरा बसलेला दिसतोय. त्याच्या टी-शर्टचं वर्णन करण्याचं कारण म्हणजे, या टी-शर्टमागे असा काही संदेश लिहिलाय, जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या टी-शर्टच्या मागे “प्रिय बायको, तुझा विश्वास तोडणार नाही, पण दारू सोडणार नाही” असं लिहिलं आहे. हा मजकूर वाचून इंटरनेटवर एकच हशा पिकला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @rushi_editor_23 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “याच्यासाठी दोन शब्द होऊन जाऊद्या…” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ११.३ मिलियन व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “यावर बायको म्हणेल, तुम्ही दारू पिऊन जर आलात तर तुम्हाला काही बोलणार नाही, पण तुमचं डोकं फोडल्याशिवाय सोडणारसुद्धा नाही.” तर दुसऱ्याने “भावासाठी १२१ बाटल्यांची सलामी” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “बेवडे कधी सुधरत नाहीत.”