Groom Bride Baarat Viral Video: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात.
लग्नाच्या या सोहळ्यात लग्नाची वरातदेखील अगदी खास ठरते. लग्नानंतर केलेला वरातीतला डान्सही अनेकांच्या लक्षात राहतो. वरातीत नवीनच लग्न झालेली काही जोडपी डान्स करताना लाजतात. तर काही जोडपी अगदी बेभान होऊन बिनधास्त नाचताना दिसतात. त्यांना मग कसलंच भान नसतं. चार लोक काय बोलतील याचा विचार न करता त्यांच्या या सोहळ्यात ते आपला आनंद शोधतात.
पण सध्या नवरदेवाचा वरातीतला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वरातीत त्याने नेमका काय धुमाकूळ घातलाय, जाणून घेऊ…
नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल (Groom Viral Video)
एका नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये नुकतंच लग्न झालेला नवरदेव जरा जास्तच उत्साही आणि आनंदी दिसत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, वरातीत नवऱ्याने नववधूला चक्क खांद्यावर बसवलं आहे. आणि तिला खांद्यावर बसवून नवरदेव अगदी जोशात डान्स करतानादेखील दिसतोय. बेंजोच्या तालाबरोबर नवरदेव नवरीला खांद्यावर बसवून जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @crazy_rider_sandipया इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ४ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आज तू नाचव उद्यापासून तुला ती नाचवेल” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “” तर एकाने ” अशी कमेंट केली.