लग्नात कोणाचा तरी खिसा कापल्याच्या, चोरीच्या बातम्या अनेकदा आपण नक्कीच ऐकतो. मात्र, अनेकवेळा असे घडते की, जवळच्या व्यक्तीने चोरी केली. तरी लक्षातही येत नाही, असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. त्या व्यक्तीने लग्नात उपस्थित असलेल्या कोणत्या पाहुण्यावर हात साफ केला नाही तर चक्क नवरदेवावरचा हात साफ केला आहे. लग्नात नवरदेवाने नोटांचा हार घातला आणि यावेळी लहान मुलांसह अनेकांच्या नजरा त्या नोटांवर खिळल्या आहेत.

लग्नात नवरदेवाच्या मित्राने केली चोरी?

असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहायला मिळाला. लग्नात नवरदेवाच्या मित्रच चोर निघाल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओमध्ये नवरदेवाला त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी लग्न मंडपात वेढलेले दिसत आहे. वराच्या गळ्यात नोटांची माळही दिसते. उत्तर भारतातील अनेक समुदायांमध्ये नोटांच्या हार हा नवरदेवाच्या पोशाखाचा एक भाग आहे.

आणखी वाचा : आराध्याने साकरली सीतेची भूमिका, राम नवमीच्या आधी फोटो झाले व्हायरल

आणखी वाचा : कतरिनाच्या या बोल्ड फोटोवर सासऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरदेवाच्या गळ्यात लटकलेल्या नोटांच्या माळातून पैसे चोरले

तेवढ्यात त्याच्या शेजारी बसलेला वराचा मित्र त्याच्या हारातून काही नोटा हिसकावण्याचा प्रयत्न करतो. काही अयशस्वी प्रयत्नांनंतर, तो काही नोटा चोरतो आणि खिशात ठेवतो. इन्स्टाग्राम पेज meemlogy ने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आता मी या पैशातून गिफ्ट देईन.” हा व्हिडिओ ८५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत