सरकारी रुग्णालयांमध्ये झुरळ, ढेकूण, उंदीर यांसारखे प्राणी नेहमीच पाहायला मिळतात. मात्र मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये असलेले कमला राजा रुग्णालयात सध्या मोठ्या संख्येने उंदरांची दहशत पाहायला मिळतेय. या रुग्णालयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; ज्यामध्ये एकाच वेळी अनेक उंदीर रुग्णांच्या वॉर्डमध्ये रुग्णांच्या सामानाची नासधूस करताना दिसतायत. कधी रुग्णांच्या बेडवर चढून, तर कधी त्यांचे सामान आणि खाद्यपदार्थ कुरडताना दिसत आहेत. या रुग्णालयात उंदरांची दहशत एवढी वाढली आहे की, लोकांना आपल्या नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी रात्रभर जागे राहावे लागत आहे. उंदरांच्या भीतीमुळे अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येण्यास घाबरत आहेत.

रुग्णाच्या नातेवाइकाने बनविला व्हिडीओ

रुग्णालयामध्ये मीडिया आणि कॅमेऱ्यांच्या प्रवेशावर बंदी असली तरी एका रुग्णाच्या नातेवाइकाने उंदरांच्या या दहशतीचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये कोणीतरी ‘लवकर रेकॉर्ड करा’, असे म्हणतानाही ऐकू येते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुग्णांच्या बेड आणि सामानावर उंदीर उड्या मारत आहेत. इतकेच नाही, तर वॉर्डमध्येही उंदीर फिरताना दिसत आहेत.

एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पीएफ खात्यातून पैसे कोणाला मिळतात? काढण्याची प्रक्रिया काय आहे? घ्या जाणून….

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

मध्य प्रदेश काँग्रेसनेही आपल्या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना, एमपी काँग्रेसने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – मध्य प्रदेशच्या आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहा, ग्वाल्हेरच्या कमला राजा रुग्णालयात रुग्णांपेक्षा जास्त उंदीर फिरत आहेत. रुग्ण आणि नवजात बालकांचे उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी नातेवाइकांना रात्रभर जागे राहावे लागतेय. मध्य प्रदेशातील कारभार भगवान भरोसे आहे. या घटनेवरुन काँग्रेसने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यांवर निशाणा साधला आहे.

मोफत एन्ट्री न दिल्याने वॉटर पार्कमध्ये बुलडोझर घेऊन पोहोचला अन् केले असे काही की…; पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपी, राजस्थानमधून उपचारांसाठी येतात रुग्ण

ग्वाल्हेरचे कमला राजा महिला रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वांत मोठे रुग्णालय आहे. हे रुग्णालय गजराज राजा वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे चालविले जाते. हे केवळ ग्वाल्हेर-चंबळचे सर्वांत जुने आणि मोठे रुग्णालय नाही, तर शेजारील राजस्थान, उत्तर प्रदेश ही राज्ये व बुंदेलखंड या जिल्ह्यातूनही येथे रुग्ण उपचारासाठी येतात. पण, रुग्ण बरा होण्यापेक्षा तो अधिक आजारी पडेल, अशी या रुग्णालयाची सध्याची स्थिती आहे. संपूर्ण रुग्णालयात रुग्णांपेक्षा उंदरांचीच संख्याच अधिक दिसतेय.