देव सगळ्यांपर्यंत पोहचू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली आहे. आई आपल्या मुलाच्या सुखासाठी आणि सुरक्षिततेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. मुलावर कोणतेही संकट आले तर आई त्याच्यासमोर ढाल बनून उभी असते. ही गोष्ट माणूस आणि प्राणी दोघांनाही लागू होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये कोब्रा कोंबडीच्या पिल्लांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो तितक्यात आई आपल्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी कोब्रावर तुटून पडते. त्यानंतर जे घडतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कोंबडी तिच्या पिल्लांसह भिंतीच्या कडेला बसली आहे. तेव्हाच तिथे एक कोब्रा येतो आणि पिलांना खाण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. कोब्रा जवळ येत असल्याचे पाहताच पिल्लांची आई त्याच्या समोर जाते आणि त्याच्यावर हल्ला करते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशाप्रकारे कोंबडी कोब्रावर तुटून पडते. त्यानंतर कोंबडीचा हल्ला पाहून कोब्रा घाबरतो आणि तिथून पळून जातो.

( हे ही वाचा: Video: पायाने स्कूटी थांबवण्याच्या नादात तरुणीचा गेला भलताच तोल; थेट नाल्यात पडली अन…)

कोब्रावर कोंबडी कशी तुटून पडली ते एकदा बघाच!

( हे ही वाचा: Video: लाल लेहेंग्यात महिलेचा भन्नाट डान्स; कॅनेडाच्या बर्फाळ भागातील ‘तो’ व्हिडिओ होतोय Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@ViralPosts5 हँडलने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ आतापर्यंत १४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ५७ हजार लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी, नेटिझन्स या व्हिडिओवर प्रचंड कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, आई आपल्या मुलाला कधीही संकटात पाहू शकत नाही. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, व्हिडिओची शूटिंग करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात टाकावे.