मीठ हा आपल्या स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. शाही जेवण आहे पण त्यात मीठच टाकलेले नाही… आपल्यापैकी कुणी त्या भोजनाला हातही लावणार नाही. अन्नाला चव येणं शक्यच नाही. मीठ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि जवळजवळ प्रत्येकजण त्याचं सेवन करतो. प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेलं हे मीठ येतं कुठून, ते पिकतं कसं, पिकवणारी मंडळी कोण आहेत. असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर, चला याची उत्तर जाणून घेऊया. हे मीठ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

समुद्रकिनारी मीठ कसे तयार होते

मीठ हे खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मिळते. मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरे तयार करुन मिळवला जातो. मीठ तयार करण्याच्या पूर्ण प्रक्रियेला १० ते १५ दिवस लागतात. मुंबई मध्ये मुलुंड व भाईंदर वसई याठिकाणी मिठागरे आढळतात. हा व्हिडीओ वसई मिठागरातला आहे. यामध्ये तुम्हा पाहू शकता, मिठागरातील जमीन ठोकूनठोकून कठीण केली असल्याने त्यात पाणी मुरत नाही. बांध घालून त्यात समुद्राचे पाणी अडवले जाते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते. आणि पाण्यातील मीठ खाली शिल्लक राहते.

हे मीठ अशुद्ध असते कारण त्यात माती मिसळलेली असते. त्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ केले जाते.खानिजे:- मानवी जीवनाची प्रगती तसेच देशाची प्रगती खानिजांवर अवलंबून असते. ती खानिजे सुद्धा आपल्याला महासागरातुन मिळतात. उदा.- फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन इ. अनेक खानिजे समुद्रात असतात. त्यामुळे खानिजांसाठी आपण काही प्रमाणात महासागरावर अवलंबून असतो. म्हणजेच खानिजांच्या दृष्टीने महासागर महत्त्वाचे आहेत हे दिसून येते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: सावधान! फ्री फायर गेमचं व्यसन; मुलाने गमावलं मानसिक संतुलन; पहा काय झालीय अवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समुद्रातील पाण्याचे उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन मीठ तयार होते. समुद्रातील पाण्यात मीठ विरघळलेले असते. उन्हाळ्यात समुद्राच्या किनाऱ्यावर उथळ भागावर मीठ तयार होते. तेथील लोकं मिठागर तयार करतात.