Internet Price in Pakistan: भारताचा शेजारी देश असलेल्या कंगाल पाकिस्तानात महागाईमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानातील सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. येथील लोकांना कुटुंब चालवणे म्हणजे तारेवरची कसरत वाटू लागले आहे. सध्या कंगाल पाकिस्तान पूर्णपणे कर्जात बुडाला आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर सुरूच आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, आज आपण पाकिस्तानमध्ये १ GB डेटाची किंमत किती? याबद्दल जाणून घेणार आहोत.
हल्ली बहुतांश लोकांच्या घरी इंटरनेट हे असतेच. आता इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजच्या काळात इंटरनेटशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. अन्न, वस्त्र निवाऱ्याइतकीच इंटरनेट ही मूलभूत गरज बनली आहे. डिजिटल क्रांतीनं जगभरात सामान्य माणसाचं आयुष्य बदलून टाकलंय. मोबाईल आणि इंटरनेट ही सध्या गरजेची गोष्ट झाली आहे. लहान, मोठे, गरीब, श्रीमंत कोणीही मोबाईलशिवाय राहू शकत नाही. या युगात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण तासन् तास सोशल मीडियावर चिकटून राहतात. दिवसेंदिवस कंगाल होत असलेल्या पाकिस्तानमध्येही इंटरनेट वापर मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे. परंतु येथील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे इंटरनेटचा वापर करणे येथील लोकांसाठी कठीणच आहे.कारण पाकिस्तानात इंटरनेट महाग आहे.
पाकिस्तानात इंटरनेट किती महाग?
पाकिस्तानच्या तुलनेत भारतात इंटरनेट खूपच स्वस्त आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये १ जीबी इंटरनेट डेटाची किंमत सुमारे ३० रुपये आहे; तर भारतात १ जीबी इंटरनेट डेटाची किंमत सुमारे १४ ते १५ रुपये आहे. पाकिस्तानमध्ये दररोज १ जीबी डेटासाठी दर महिने सुमारे ९०० रुपये खर्च करावे लागतात. भारतात हाच खर्च दरमहा ३००-४०० रुपये येतो. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की, पाकिस्तानमध्ये इंटरनेट भारतापेक्षा महाग आहे. माहितीनुसार, दक्षिण आशियातील सर्वांत महाग इंटरनेट वापरत असलेल्या देशांपैकी आर्थिक अवस्था बिघडत चाललेला पाकिस्तान एक आहे.
पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया वापरण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो. पाकिस्तानमध्ये लोकांना व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम व फेसबुक यांसारख्या अॅप्स वापरण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बांगलादेशमध्येही इंटरनेट पाकिस्तानपेक्षा स्वस्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशमध्ये १ जीबी डेटाची किंमत २६ रुपये आहे.