Viral video: पत्नी- पत्नीचे नातं कायमच वेगळे असते. जर दोघांमध्ये वाद झाले तरी सर्व घरामध्ये अशांतता निर्माण होते जर हेच नाते अतिशय प्रेमळ असेल तर संपूर्ण घर आनंदाने राहते. अर्थात नवरा-बायकोच्या नात्यांचा परिणाम संपूर्ण त्यांच्या आयुष्यावर आणि घरावर होत असतो. मात्र सध्या नवरा-बायकोचे नाते आनंदी असल्यास दोघही आयुष्याचा आनंद कसा लुटतात हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून तुम्हाला समजेल.

सध्या सोशल मीडियावर या नवरा-बायकोच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पती-पत्नीचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून सारेच थक्क झाले असून, टॅलेंट असेल तर ते जगासमोर येतेच याचेच हे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशाच पती पत्नींच्या व्हिडीओंनी धुमाकुळ घातला आहे. आता असाच व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे.लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका नवरा बायकोचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरूवात करतात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांच्या सुख दु:खात कायम बरोबर राहतात. या नात्यात एक वेगळे प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नामध्ये नवरा बायकोनं असा डान्स केलाय की सगळे नातेवाईक बघतच राहिले आहेत. दोघही इतके जबरदस्त नाचले आहेत की, तुमचीही नजर हटणार नाही. शेवटी नवऱ्यानं आपल्या बायकोला उचलूनही घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Ashwini Waghmare (@ashu_ahire_waghmare)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ashu_ahire_waghmare नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.