Viral Video : जोरदार पावसाला सुरुवात झाली रे झाली की, अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होते. वाहतुकीची कोंडी होते आणि सामान्य माणसाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. जोरदार पावसाने हजेरी लावली आणि उड्डाणपुलाजवळ पाणी साचले आहे. पण, अशातच एका पोलिस कर्मचारी महिलेला नाला साफ करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले आहे.
हैदराबादच्या पश्चिम विभागातील टोली चौकी उड्डाणपुलाजवळील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओची सुरुवात पाण्याने तुडुंब भरलेल्या रस्त्याने होत आहे. जिथे एका उड्डाणपुलाच्या बाजूला पाणी भरलेले दिसते आहे. रस्त्यावर एक नाला आहे आणि कचरा टाकल्यामुळे तो तुडुंब भरला आहे; ज्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेले दिसून येत आहे. नाल्यात कचरा अडकलेला पाहून एक महिला ट्रॅफिक पोलिस कर्मचारी तिथे जाते आणि नाल्यात अडकलेला कचरा स्वतःच्या हाताने बाहेर काढताना दिसून येते.हैदराबाद महिला पोलिस कर्मचाऱ्याने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कसा पुढाकार घेतला एकदा तुम्ही सुद्धा व्हिडीओतून बघाचं…
हेही वाचा…तू ‘पागल’ है.. ट्रेनमध्येच महिलेचा पारा चढला अन् जोडप्याला केली धक्काबुक्की, Video झाला व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :
नाला साफ करण्यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्याचा पुढाकार :
स्वच्छतेचे असे अनोखे काम करताना पाहायला मिळाले त्या महिला ट्रॅफिक पोलिसाचे नाव श्रीमती डी. धना लक्ष्मी, असे आहे. समाजाची सेवा करण्यासाठी त्या पुढे आल्या आहेत आणि नाला आपल्या हाताने साफ करताना दिसून आल्या आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला एक अज्ञात व्यक्ती नाल्यातील कचरा साफ करीत आहे आणि हे पाहून ट्रॅफिक पोलिस कर्मचारी लक्ष्मी रस्त्यावर उतरून, त्या व्यक्तीची मदत करताना दिसून आल्या आहेत. दोघांच्या प्रयत्नामुळे पाण्याचा वेग कमी झाला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. अनेकदा नाला साफ करताना किंवा गटार साफ करताना हातमोजे वापरले जातात. पण, या महिला कर्मचारी पोलिसाने हातमोजे न वापरता हा कचरा उचलला आहे हे तुम्हाला व्हिडीओत दिसून येईल. हे पाहून हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी कर्मचारी लक्ष्मी यांचे कौतुक केले आहे.
हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी हा व्हिडीओ @Hydrabad Traffic Police त्याच्या अधिकारीक ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे; जो अनेकांचे मन जिंकत आहे. व्हिडीओ पाहणारे अनेक जण ‘खरोखर उत्तम सेवा’, ‘नागरिकांना कचरा टाकताना लाज वाटायला पाहिजे’, “खूप छान, पण तुम्ही GHMC ला हे काम करायला लावलं तर बरं होईल’, ‘कोणीही मदत करण्यासाठी थांबलं नाही’, ‘आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सुरक्षेला महत्त्व देणारी माणसं’ असे अनेक जण या व्हिडीओखाली कमेंट करताना दिसून आले आहेत.