विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्याला अखेर सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात हा अंतिम सामना रंगतोय. भारतीय संघाच्या विजयासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. लोक मीम्सच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत. तर आत्तापर्यंत झालेल्या सामन्यातील काही गोष्टींवर मीन्सच्या माध्यमातून मजेशीर टिप्पणी करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, ‘कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडिया अहमदाबादच्या खेळपट्टीवर वर्ल्ड कप फायनलची तयारी करत आहेत. स्पर्धेतील प्रमुख खेळाडू. आशा आहे की, भारत विजयी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा काही मजेशीर मीम्स

यासोबतच लोक जुन्या विश्वचषक सामन्यांचे व्हिडिओही शेअर करत आहेत. देशभरातून भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात येत आहेत. काही ठिकाणी आरती तर काही ठिकाणी ढोल वाजवले जात आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा देण्यासाठी अहमदाबादला पोहोचला. दरम्यान यापूर्वीही त्याने भारतीय संघ जिंकताना दिसेल, अशी आशा व्यक्त केली होती