India vs Australia, Cricket World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. भारताने उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत आठव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही मजबूत संघातील थरारक सामना पाहण्यासाठी देशासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीव्ही आणि मोबाईवर खिळल्या आहेत. आजचा सामना इतका महत्वाचा आहे की, त्यातील प्रत्येक क्षण चाहत्यांना पाहायचा आहे. परंतु हा सामना सुरु होताच डिस्नी+ हॉटस्टार अॅपवरती सामना पाहणाऱ्या चाहत्यांना काही समस्यांचा सामना करावा लागल्याने ते नाराज झाले आहेत.

खरं तर, अनेक चाहते डिस्नी + हॉटस्टार (Disney+Hostar) अॅपवरती सामना पाहणं पसंत करतात. परंतु आजच्या फायनल सामन्याच्या सुरुवातीचा काही काळ डिस्नी + हॉटस्टारचे लाइव्ह-स्टीमिंग काम करत नव्हते असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहते नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी ही नाराजी एक्सवर दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करणारी काही मीम्स शेअर केली आहेत जी सध्या व्हायरल होत आहेत.

व्हायरल मिम –

भारताची धावसंख्या –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या २० षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११५ धावा आहे. विराट कोहली ४० चेंडूत ३९ आणि केएल राहुल ३४ चेंडूत १९ धावांवर खेळत आहे.