भारत आणि झिम्बाव्बेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ क्रिकेट मैदानावर झाला. या सामन्यात भारताने यजमान संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये अक्षर पटेल ईशान किशनवर रागावताना दिसत आहे. लाइव्ह मॅचदरम्यान ईशान किशनने असे काही केले की अक्षर पटेलला राग अनावर झाला. मात्र, ईशानने आपल्या चुकीबद्दल अक्षर पटेलची माफीही मागितली आहे.
IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी
झिम्बाब्वेच्या डावाच्या २८व्या षटकात ही घटना घडली. हुडाच्या दुसऱ्या चेंडूवर बुर्लेने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉट खेळला आणि दोन धावा काढल्या. तिथे असलेल्या ईशान किशनने चेंडू फेकला तेव्हा तो शॉर्ट कव्हरवर उभ्या असलेल्या अक्षर पटेलच्या जवळ पडला. ईशानने फेकलेला चेंडू आपल्याला लागेल म्हणून अक्षर आपल्या डोक्यावर हात धरून मैदानावर बसला. तथापि, हा चेंडू अक्षराला लागला नाही. चेंडू अक्षरपासून काही अंतरावर जाऊन पडला असला, तरीही त्याला या गोष्टीचा प्रचंड राग आला. यानंतर अक्षराने लगेच ईशानकडे पाहून आपली नाराजी व्यक्त केली. ईशानने लगेचच त्याची माफीही मागितली. दरम्यान ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करून यजमान संघाने ३८.१ षटकांमध्ये सर्वबाद १६१ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेले १६२ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने पाच गडी गमावून २५.५ षटकांमध्ये पार केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का कर्णधार केएल राहुलच्या रूपात बसला. तो केवळ एक धाव करून तंबूत परतला.
IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअॅक्शन
पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे या सामन्यातसुद्धा धवन-गिल जोडी भारतीय डावाचा शेवट करेल असे वाटत असताना धवन ३३ धावा करून धवन बाद झाला. त्यानंतर, ईशान किशन (६), शुबमन गिल (३३) आणि दीपक हुडा (२५) बाद झाले. यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी भारतीय डावाचा शेवट केला. भारताच्यावतीने संजू सॅमसनने सर्वाधिक ४३ धावा केल्या.