भारतील रेल्वेला देशाची लाईफलाइन म्हटले जाते. ही रेल्वे सेवा देशातील खेड्यापाड्यासह मोठ्या शहरांना जोडण्याचे काम करते. भारतीय रेल्वे हे प्रवासाचे अतिशय सोयीचे आणि सुरक्षित साधन मानले जाते. यामुळे भारतीय रेल्वेने दररोज कोट्यावधी लोक प्रवास करतात. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वे हजारो गाड्या चालवत आहे. पण प्रवाशांना प्रवास करताना भारतील रेल्वेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. यात रेल्वेच्या तिकिटांबाबतही काही नियम आहेत, ज्याचे पालन न केल्यास रेल्वेचे तिकीट असूनही प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ..

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमची ट्रेन दिवसा असेल, अशा परिस्थितीत तुम्हाला ट्रेनच्या वेळेच्या दोन तास आधी स्टेशनवर पोहोचावे लागेल. याशिवाय रात्रीची ट्रेन असेल तर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ६ तास आधी पोहोचू शकता आणि स्टेशनवर थांबू शकता. जर तुम्ही दिलेल्या वेळेत स्टेशनवर पोहोचलात तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही.

indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
Chandrapur, Railway Police, Arrest 14 Ticket Brokers, Black Marketing Tickets, wani, bhadrwati, ghugus, railway ticket black market, chandrapur railway ticket black, e ticket black,
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १४ दलालांना अटक; चंद्रपूर, घुग्घुस, येथे कारवाई
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित

पण वर दिलेल्या वेळेपूर्वी स्टेशनवर पोहचल्यास टीटीई तुमच्याकडून दंड आकारु शकतो. जर तुम्हाला नमूद केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ रेल्वे स्टेशनवर थांबायचे असेल तर अशावेळी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते.

जर तुम्ही ज्या ट्रेनचे तिकीट बुक केले आहे ती ट्रेन उशीरा आली असेल तर अशावेळी हा नियम लागू होत नाही. यावेळी वेळ मर्यादा बदलू शकते. स्थानकावरील प्रचंड गर्दी करण्यासाठी भारतीय रेल्वेने हा नियम लागू केला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी जेव्हा तुम्ही ट्रेनचा प्रवास कराल तेव्हा हा नियम लक्षात ठेवा, अन्यथा विनाकारण तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.