असाध्य ते साध्य करता येतं त्यासाठी फक्त मन लावून एखादं काम करावं लागतं असं म्हटलं जातं. याचेच एक उदाहरण समोर आलं आहे, ते म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये आपल्या अतुलनीय कामगिरीने अनेकांची मने जिंकलेले राम बाबू. कारण राम बाबू हे असे अ‍ॅथलेटिक आहेत ज्यांच्या यशामागे एक प्रेरणादायी कहाणी आहे. कारण जीवनात अनेक अडचणी आणि संकटं असतानाही राम बाबू यांनी ३५ किमी रेस वॉक स्पर्धेत मिश्र सांघिक कांस्यपदक जिंकले आहे.

म्हणूनच IFS अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाची प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. एकेकाळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) अंतर्गत कामगार म्हणून काम करणारे आणि वेटर असलेले राम बाबू यांनी प्रतिष्ठित अशा आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्य पदक जिंकले आहे. परंतु इथपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप संघर्षमय होता.

Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

राम बाबू यांची ही प्रेरणादायी कहाणी IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटद्वारे शेअर केली आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “हे राम बाबू आहे, जे एकेकाळी मनरेगा अंतर्गत मजूर आणि वेटर म्हणून काम करत होते. आज त्यांनी #AsianGames मध्ये ३५ किमी रेस वॉक मिश्र संघात कांस्य पदक जिंकले. “निश्चय आणि धैर्याबद्दल बोलुया.” तर या ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राम बाबू शेतात काम करताना दिसत आहेत.

हेही वाचा- अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन ज्योतिषाला हात दाखवला आणि घात झाला, भेट दिलेली वस्तू खाल्यामुळे महिलेने गमावला जीव?

३५ किलोमीटर रेस वॉक मिश्र सांघिक स्पर्धेत भाग घेत, राम बाबूंनी ५ तास ५१ मिनिटे आणि १४ सेकंदांच्या एकत्रित वेळेसह उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या अतुलनीय कामगिरीने केवळ त्यांचा सन्मान आणि गौरव झाला नाही तर त्यांच्या या कामगिरीने संकटांचा सामना करणाऱ्या असंख्य व्यक्तींना प्रेरणा दिली आहे.

कासवान यांनी शेअर केलेली ही पोस्ट एखाद्या व्यक्तीने केलेला दृढनिश्चय काय करू शकतो याची आठवण करून देणारी आहे. सध्या राम बाबू यांची प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आशियाई क्रिडा स्पर्धा २०२३ मधील भारताच्या एकूण ऍथलेटिक्स पदकतालिकेत राम बाबूच्या कांस्यपदकानेही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर या पोस्टवर अनेक नेटकरी राम बाबू यांचे अभिनंदन आणि कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हे खूप कौतुकास्पद आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “उत्कृष्ट सर. अशा प्रेरणादायी गोष्टी कव्हर केल्या पाहिजेत आणि व्हायरल केल्या पाहिजेत. ते एक सुपरहिरो आहेत. त्यांचा अभिमान आहे.”