सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाहनांवर, रस्त्यांवर सर्वत्र अळ्या पडलेल्या दिसत आहे. हा व्हिडीओ चीनची राजथानी बीजिंगमधील असल्याचा दावा केला जात आहे. येथे आकाशातून अगदी पावसाच्या थेंबांप्रमाणे अळ्यांचा सडा पडला आहे.

आकाशातून पडणाऱ्या अळ्यांचे काही व्हिडीओ आणि फोटोही समोर आले आहेत. ज्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक गाड्या अळ्यांनी पूर्णपणे झाकून गेल्याचे दिसतेय. तर रस्त्यावरही सर्वत्र अळ्यांचा सडा पडलेला दिसतोय. अशा परिस्थितीत लोकांना छत्री घेऊन घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे. या अतिशय किळसवाण्या घटनेमागील कोणतंही कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या सोशल मीडियावर यूजर्सकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतेय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही वाहनं रस्त्याच्या कडेला उभी असल्याची दिसत आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात अळ्या पडल्या आहेत. केवळ वाहनांवरचं नाही तर रस्त्यावरही या अळ्यांचा मोठा ढीग दिसतोय. रस्त्यावर सर्वत्र या अळ्यांचा सडा पडला आहे. या व्हिडीओत एक महिला या अळ्यांपासून वाचण्यासाठी छत्री घेऊन रस्त्याने चालताना दिसतेय. तर आकाशातही काही अळ्या फिरताना दिसतायत. याठिकाणी अळ्यांचा पाऊस पडल्याचा दावा केला जात आहे. ‘द इनसायडर पेपर’ या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत ७.५ मिलियन लोकांनी पाहिला आहे.

रस्ते, वाहनं, फुटपाथ सर्व या किळसवाण्या अळ्यांनी भरून गेले आहे. परंतु हा काय प्रकार आहे? खरंच अळ्यांचा पाऊस झाला का? झाला असेल तर का झाला? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.

दरम्यान या व्हायरल व्हिडीओवर आता सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आपला शेवट जवळ आला आहे’. तर दुसऱ्या युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले की, ‘माझी इच्छा आहे की, जगाचा अंत होण्याआधी झाला संसार थाटून झाला पाहिजे’. तर तिसऱ्या एका युजरने ‘हा नवा चायनीज व्हायरस आहे’ असे म्हटले आहे. इतकचं नाही तर काही युजर्संनी ‘हा तर जगाचा अंत’ असल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण एचआयटीपीच्या म्हणण्यानुसार, मदर नेचर नेटवर्क या जर्नलने म्हटले की, कुठेतरी जोरदार वारे वाहत असावेत, त्यामुळे मोठ्यासंख्येने अळ्यांप्रमाणे दिसणारे हे प्राणी इथे उडून आले असावेत.