आतापर्यंत तुम्ही लग्नमंडप, समुद्रकिनारा पंचतारांकित हॉटेल्समध्ये लग्न लावलेली पाहिली असतील पण उत्तरप्रदेशमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावण्याचा गंमतीशीर प्रकार घडला आहे. त्याचं झालं असं की, वधू पक्षातील एक महिलेच्या कोणीतरी श्रीमुखात भडकवली. यामुळे लग्न लागण्यापूर्वीच मंडपात मोठा वाद झाला. यामुळे लग्न थांबवण्यात आले. ज्या महिलेला मारहाण झाली होती ती व्यक्ती वधूची आत्या होती. त्यामुळे हा संपूर्ण वधू पक्षाचा अपमान असल्याचे सांगत मुलीकडच्यांनी लग्न करण्यास ठाम नकार दिला. हा वाद बराच काळ सुरू होता. दरम्यानच्या काळात वधू पक्षातल्या लोकांनीही खट्टू होऊन मंडपातून निघून जाण्यास सुरूवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगप्रसिद्ध कॉम्प्युटर वॉलपेपरची छबी टिपणारा फोटोग्राफर नव्या मोहीमेवर

Viral Video : ट्रेनमध्ये शिरलेल्या सापाला हातानेच मारलं

वरपक्षाकडून अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतरही हे प्रकरण काही निवळलं नाही. हे प्रकरण इतकं वाढलं की, मारहाण आणि भांडणाची तक्रार करण्यासाठी वधू आणि वर पक्षाकडील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. सगळे वऱ्हाडी पाहून कन्नौज पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांना थोडा धक्काच बसला. प्रकरण नाजूक आहे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सामोपचाराने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले आणि वधू पक्षाकडील लोक लग्नासाठी राजी झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्येच त्यांचे लग्न लावून देण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kannauj couple ties the knot at police station
First published on: 24-11-2017 at 13:52 IST