Snake Viral Video : उन्हाळ्यात अनेकदा जंगल परिसराजवळील घरातून साप आढळून येत असल्याचे पाहिले असेल. हे साप बहुधा काळोख्या आणि कोरड्या ठिकाणी लपून बसलेले असतात. तुम्ही सोशल मीडियावरही घरात साप लपून बसलेले अनेक व्हिडीओ पाहिले असतील. बाईक, कार किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही साप लपून राहू शकतो. या वेळी सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवले जाते. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये साप अशा ठिकाणी लपून बसला होता ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. हा साप चक्क टॉयलेट सीटमध्ये लपून बसला होता, त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता टॉयलेट सीटवर बसण्याआधी मनात १०० प्रश्न निर्माण होतील.
टॉयलेट सीटमध्ये लपून बसला भलामोठा साप
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टॉयलेट सीटमध्ये लपून बसलेल्या सापाला शेपटीला धरून बाहेर काढले जात आहे. साप टॉयलेट सीटमध्ये अशा प्रकारे लपून बसलेला दिसत आहे, जे पाहिल्यानंतर तुम्ही अंदाजही करू शकत नाही की साप अशा ठिकाणीही लपून बसू शकतो. व्हिडीओमध्ये एका घरातील नॉर्मल टॉयलेट दिसत आहे. त्या टॉयलेट सीटच्या बाजूने हा साप कोणालाही सहज दिसणार नाही या प्रकारे लपून बसला होता. त्यामुळे टॉयलेट वापरणारे लोक हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खूप घाबरले आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बैठ्या टॉयलेट सीटच्या आत एक किंग कोब्रा लपला आहे. या वेळी एक सर्पमित्र अतिशय काळजीपूर्वक आधी सापाची शेपटी पकडतो. यानंतर सापाचे संपूर्ण शरीर हळूहळू शौचालयातून बाहेर काढतो. यानंतर सापाला व्यवस्थित पकडून एका प्लास्टिकच्या बरणीत बंद करतो. हा व्हिडीओ (@snake_naveen) नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सापाच्या या धडकी भरवणाऱ्या व्हिडीओवर आता यूजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. यावर आता अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर टॉयलेटला जायला भीती वाटत असल्याचे सांगितले आहे. त्याच वेळी टॉयलेटमध्ये ठेवलेला मग पाहून अनेकांना हसू येत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले – दादा, हा मग कसा तरी साफ करा. तर अनेक जण साप पकडणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.