Korean Boy Bihari Accent : कोरिअन ड्रामा, चित्रपट पाहणारा एक नवा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे तयार झाला आहे. BTS, BlackPink सारख्या म्युझिक ग्रुपच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरिअन अभिनेते आणि अभिनेत्रींबाबत जाणून घेण्यासाठी कित्येक लोक कोरिअन भाषा शिकत आहेत. पण असा एक कोरिअन व्यक्ती आहे ज्याला भारतीय भाषेची आवड आहे.

नुसती आवडचं नव्हे तर हा व्यक्ती अगदी स्पष्ट भारतीय भाषेत संवाद साधू शकतो. सोशल मिडियावर सध्या या कोरिअन व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो उत्तम हिंदी भाषा बोलतो आहे तेही अस्सल बिहारी शैलीत. लोकांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला असून या कोरिअन व्यक्तीचे कौतुक करत आहे.

कोरिअन व्यक्ती बिहारी शैलीत बोलतोय हिंदी

इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक कोरिअन व्यक्ती बिहारी शैलीत स्पष्टपणे हिंदीमध्ये बोलत आहे. प्रशांत कुमार या कॉन्टेट क्रिएटरने हा व्हि़डीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये कुमार चार्ली नावाच्या कोरियन व्यक्तीसोबत गप्पा मारत आहे.

हेही वाचा – धारावीची झोपडपट्टी ते आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडचा चेहरा! १४ वर्षीय मलीशा खरवाला कशी मिळाली इतकी मानाची संधी?

या व्हिडिओमध्ये कोरिअन व्यक्ती पटनामधील काही ठिकाणी फिरताना दिसत आहे. त्याची बिहारी शैलीतील हिंदी इतकी परफेक्ट आहे की तुम्ही थक्क व्हाल. चार्लीने हिंदीमध्ये गाणे गातानाचे काही व्हिडिओ देखील पोस्ट केले आहे. चार्लीने 40Kahani नावाचे इंस्टाग्राम अकाऊंट आणि युट्यूब चॅनेल देखील सुरू केले आहे.

चार्ली आणि कुमार दोघांनी इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत. एका व्हिडिओमध्ये कुमार चार्लीला पटना येथील मरीन ड्राइव्हबद्दल विचारतो तेव्हा तो त्याच्या बिहारी स्टाईलमध्ये सांगतो की, “बहोत बदल गया है. ये जो दिख रहा है, ये बहोत साफ होगा. ये ब्रिज तो भयंकर बना है ( हे शहर खूप बदलले आहे. सर्व काही स्वच्छ झाले आहे असे दिसते. बांधण्यात आलेला पूल देखील चांगला आहे.)

हेही वाचा- कॅडबरीच्या पॅकेजिंगचा रंग नेहमी जांभळाच का असतो? जाणून घ्या त्यामागचा रंजक इतिहास

कोरिअन व्यक्तीची बिहारी ऐकून थक्क झाले नेटकरी

आतापर्यंत हा व्हिडिओ ७६ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर कित्येकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, हा तर माझ्यापेक्षा चांगली बिहारी बोलतोय”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी एकाने प्रतिक्रिया दिली की, “हा माणूस कोरियन दिसतो आणि तो वेगळ्या शैलीमध्ये हिंदी बोलतो हे खरं तर ते फार गोंडस आहे, त्याचे हसणे देखील खूप सुंदर आहे.. आणि तुम्ही दोघे ज्या प्रकारे संवाद साधता ते खूप गोंडस आहे.”